नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली होती. या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला आश्वासन दिले होते की, ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवल्यानंतर ते तिला भेट देऊन आइसक्रीमचा आस्वाद घेतील. अशातच सोमवारी (१६ ऑगस्ट) नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूसह टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवलेल्या खेळाडूंची भेट घेतली आहे.
रविवारी (१५ ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवलेल्या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. यानंतर सोमवारी (१६ ऑगस्ट) त्यांनी आपल्या निवासस्थानी या खेळाडूंना नाश्ता करण्यासाठी आमंत्रण दिले होते. यावेळी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारे सर्वच खेळाडू उपस्थित होते.
भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत एकूण ७ पदकं जिंकली. ही भारताची ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. गोल्डन बॉय नीरज चोप्राने भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते. तसेच पीव्ही सिंधूने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. यामुळेच मोदींनी आपले आश्वासन पूर्ण करत पीव्ही सिंधूसोबत आइसक्रीमचा आस्वाद घेतला. पीव्ही सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू ठरली.(Pn narendra modi eats ice cream with tokyo Olympics bronze medalist pv sindhu)
Some more images…#Tokyo2020 pic.twitter.com/1fnAmR60LH
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) August 16, 2021
Bonding over churma!
PM Shri Narendra Modi and @Neeraj_chopra1 share a lighter moment.#Tokyo2020 pic.twitter.com/DK7HLohKtU
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) August 16, 2021
PM Shri @narendramodi meets Olympians who made India proud…#Tokyo2020@PMOIndia @ianuragthakur @Media_SAI @IndiaSports @WeAreTeamIndia pic.twitter.com/nbCwdznuU9
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) August 16, 2021
तसेच गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत मिळून नरेंद्र मोदी यांनी चुरमाचा आस्वाद घेतला. यासह नरेंद्र मोदींनी भारताला ४१ वर्षानंतर हॉकी या खेळात पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंची देखील भेट घेतली आणि त्यांच्यासोबत संवाद देखील साधला. तसेच टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत कुस्तीपटू रवी दहिया आणि बजरंग पूनिया यांनी देखील पदक जिंकले होते. त्यांच्यासोबत देखील नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहच्या एकामागून एक वेगवान बाउन्सर्सला त्रासला इंग्लिश क्रिकेटर, मैदानातच ऐकवली खरीखोटी
भारताला विजयासाठी १६५ धावांची आघाडीही पुरेशी! यापूर्वी इंग्लंडविरुद्धच केलीय ‘ही’ अद्भुत कामगिरी