रणजी ट्रॉफी 2022-23मध्ये पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेत बुधवारी (11 जानेवारी) आसाम विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने ही तुफानी शतकी खेळी केली. याबरोबर तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात मुंबईकडून सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा पहिला फलंदाजही ठरला आहे. त्याने 326 चेंडूतच 300 धावांचा टप्पा गाठला.
या सामन्याच्या पहिल्या दिवशी (10 जानेवारी) शॉने 107 चेंडूत शतक आणि 235 चेंडूत द्विशतक पूर्ण केले होते. त्याच्या या धडाकेबाज खेळीने मुंबईने पहिल्या डावात धावांचा डोंगर रचला आहे. लंचब्रेकपर्यंत शॉ 379 धावा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या 131 धावा झाल्या होत्या. यामुळे मुंबईचा पहिला डाव 3 विकेट्स गमावत 598 धावा असा मजबूत स्थितीत होता. शॉचा स्ट्राईक रेट 98.96 असून त्याने 49 चौकार आणि 4 षटकार मारले.
लंचब्रेकनंतर शॉ पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने उत्तम फलंदाजी केली. तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावासंख्या करणारा दुसराच फलंदाज ठरला आहे. पहिल्या स्थानावर बीबी निंबाळकर (BB Nimalkar) आहेत. त्यांनी 1948-49च्या हंगामात महाराष्ट्राकडून खेळताना काथियावारविरुद्ध नाबाद 443 धावा केल्या होत्या.
Highest individual score in Ranji Trophy history:
443* by B B Nimbalkar
379 by Prithvi Shaw
— Johns. (@CricCrazyJohns) January 11, 2023
या सामन्यात शॉने मुशीर खानसोबत पहिल्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी आणि रहाणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी 401 धावांची भागीदारीही केली. त्याला रियान पराग याने पायचीत केले. तो मुंबईकडून या स्पर्धेत त्रिशतक करणारा आठवाच खेळाडू ठरला. त्याचबरोबर त्याने संजय मांजरेकरच्या 377 धावसंख्येला मागे टाकले आहे. मांजरेकरांनी 1990-91च्या हंगामात ही खेळी केली होती.
शॉने प्रथम श्रेणी पदार्पण 2017मध्ये केले होते. त्यावेळी रणजी ट्रॉफीच्या तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने 4 आणि 120 अशा धावा केल्या होत्या. हा सामना मुंबईने 6 विकेट्सने जिंकला होता आणि शॉला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्याने प्रथम श्रेणीच्या 41 सामन्यात 12 शतके आणि 15 अर्धशतकांच्या सहाय्याने 3500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
शॉ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलामीला येत सर्वोच्च धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. आधी हा विक्रम गुजरातच्या समित गोयल (Samit Gohel) याच्या नावावर होता. त्याने 2016च्या रणजी ट्रॉफीतील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ओडिशाविरुद्ध नाबाद 359 धावा (723) केल्या होत्या.
शॉ हा रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक, विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक आणि सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतकी खेळी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. (Prithvi Shaw becomes highest scorer by a Mumbai player in Ranji Trophy history)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्रविड@50: पहिल्याच आयसीसी पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा ‘मिस्टर डिपेंडेबल’
उपकर्णधार बनताच हार्दिकचे बदलले तेवर! दुसरी धाव असूनही पळण्यास विराटला दिला नकार, पुढे….