इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये मंगळवारी (27 ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सने सलामीवीर पृथ्वी शॉला संघात स्थान दिले नाही. मागील काही सामन्यांमध्ये शॉ फॉर्ममध्ये नव्हता. शॉ नियमितपणे धावा करत नाही आणि खेळाडूला मनःशांतीसाठी विश्रांतीची आवश्यकता असते असे इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉनने सांगितले.
मनःशांतीसाठी दिली जाते विश्रांती
पृथ्वी शॉबद्दल विचारले असता इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉ म्हणाला की, “कधीकधी एखाद्या खेळाडूला मनःशांतीसाठी विश्रांतीची आवश्यकता असते. प्रशिक्षक म्हणून रिकी पाँटिंगला अधिक अनुभव आहे. खेळाडूंचे व्यवस्थापन कसे करावे याची त्याला कल्पना आहे. पृथ्वी शॉ एक प्रतिभावान खेळाडू आहे याबद्दल काहीच शंका नाही.”
शॉ नियमितपणे करत नाही धावा
“मला माहित आहे की टी20 हा क्रिकेटमधील अवघड प्रकार आहे. तरीही सर्वोत्कृष्ट खेळाडू अजूनही चांगली कामगिरी करत आहेत. संघासाठी धावा फटकावण्याची जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पाडत आहेत. शॉ नियमितपणे धावा करत नाही. त्याला थोड्या विश्रांतीची आवश्यकता आहे असे मला वाटते. प्रत्येकाने म्हटल्याप्रमाणे तो खरंच चांगला फलंदाज आहे,” असेही पुढे बोलताना वॉ म्हणाला.
सातत्याने केला नाही चांगला खेळ
शॉच्या कामगिरीबद्दल बोलताना वॉ म्हणाला की, “कधीकधी एखाद्या खेळाडूला काही काळानंतर विश्रांती दिली जाते. मी हे पृथ्वी शॉबद्दल बोलत नाही. शॉने संघात स्थान कायम राखण्यासाठी सातत्याने चांगला खेळ केला नाही”.
महत्त्वाच्या बातम्या-
-चेन्नईविरुद्ध दिल्लीच्या विजयाचा नायक ठरलेल्या पृथ्वी शॉने केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ
-पृथ्वी शॉने ‘या’ खास यादीत अय्यर, सॅमसनला टाकले मागे, आता रिषभ पंतच्या विक्रमावर आहे नजर
ट्रेंडिंग लेख-
-बीडच्या छोट्याशा गावातील ‘या’ पोरानं क्रिकेटचं मैदान अक्षरशः दणाणून सोडलं
-…आणि सचिनचे शब्द हार्दिकने खरे करून दाखवले !
-चार असे निर्णय, जे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय कसोटी संघासाठी ठरु शकतात महागडे