---Advertisement---

पृथ्वी शॉच्या अवघड जागी लागला चेंडू, मग फलंदाजाने भर मैदानातचं केलं असं काही; पाहून व्हाल लोटपोट

On: मंगळवार, मे 4, 2021 7:27 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघ सहकार्‍यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध संघाच्या खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असते. नुकत्याच पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील पृथ्वीबद्दल असाच एक मजेशीर प्रसंग घडला. यावेळी पृथ्वीने अवघड जागेवर चेंडू लागल्यानंतर एक वेगळीच प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सोशल मीडियात अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील तिसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रायली मेरिडिथचा एक वेगवान चेंडू पृथ्वीच्या अवघड जागी लागला. यावेळी पृथ्वी प्रचंड वेदनेत जाणवत होता. यानंतर पृथ्वीने खाली बसून एक वेगळीच कृती केली ज्याद्वारे सोशल मीडिया अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्याने मैदानावर बसत पॅन्टमध्ये डोकावून पाहिले. ही कृती करतेवेळी तो स्वत:ही हसत होता.

https://twitter.com/Vigneshcdm1/status/1389027277262888961?s=20

दरम्यान सामन्याचा विचार केला असता, रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्स विरुद्ध सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावत 166 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून कर्णधार मयंक अग्रवालने सर्वाधिक नाबाद 99 तर डेवीड मलानने 26 धावांची खेळी केली. दिल्लीकडून कागीसो रबाडाने 3 गडी बाद केले.

प्रत्युत्तरात 167 धावांच्या माफक धावसंख्येचा पाठलाग दिल्ली कॅपिटल्सने केवळ 3 गडी गमावत पूर्ण केला.दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने बिनबाद 63 धावांची शानदार खेळी केली. पृथ्वीने देखील 22 चेंडूत 39 धावांची आक्रमक खेळी करत त्याला योग्य साथ दिली. पंजाब विरुद्धच्या विजयाने दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत प्रथम क्रमांकवर पोहोचले असून, त्यांचे लक्ष साखळी फेरीअखेर टॉप 2मध्ये राहण्याचे असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

दिल्लीच्या संघाला विलगीकरणात जाण्याचे आदेश! कोलकाताचे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

आयपीएल स्पर्धा गाजवणारे हे ५ खेळाडू आगामी काळात करू शकतात भारतीय संघाकडून पदार्पण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल होणार स्थगित? बीसीसीआय अधिकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---