---Advertisement---

पदार्पणाच्या सामन्यातच पृथ्वी शाॅचे खणखणीत नाबाद अर्धशतक

On: गुरूवार, ऑक्टोबर 4, 2018 10:56 AM
---Advertisement---

राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात पृथ्वी शाॅने नाबाद अर्धशतकी खेळी केली आहे. त्याने ५६ चेंडूंचा सामना करताना नाबाद ५० धावा केल्या आहेत.

या नाबाद अर्धशतकी खेळीत त्याने ७ चौकार खेचले आहेत.

आज भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीला आलेल्या शाॅ आणि केएल राहुलने केवळ ३ धावांची भागीदारी केली. राहुलला ४ चेंडूत भोपळाही फोडता आला नाही.

दुसऱ्या बाजूला युवा शाॅने अनुभवी चेतेश्वर पुजाराबरोबर चांगली खेळी करताना अर्धशतक केले. सध्या भारतीय संघाच्या १८ षटकांत १ बाद ८९ धावा झाल्या आहेत.

पदार्पणातच अर्धशतकी खेळी करणारा शाॅ सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. यापुर्वी हा विक्रम अब्बास अली बेग यांच्या नावावर होता. त्यांनी २० वर्ष आणि १२६ दिवस वय असताना अर्धशतक केले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment