बुधवारी(१३ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर टेबल टॉपर्स दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रवास इथेच संपला. या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या ताफ्यात निराशेची लहर पसरली होती.
आयपीएल २०२१ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने आपला दरारा निर्माण केला होता. परंतु निर्णायक सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवण्यात अपयश आले आहे. यापूर्वी क्वालिफायर १ च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत केले होते. तर क्वालिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाने पराभूत केले.
या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडू खूप नाराज झाल्याचे दिसले. दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ला देखील अश्रू अनावर झाले होते. या सामन्यानंतरचा त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पृथ्वी शॉ ड्रेसिंग रूममध्ये बसला आहे. तसेच तो आपले अश्रू पुसताना दिसून येत आहे. तसेच सामना पराभूत झाल्यानंतर मैदानावर पडून रडत असल्याचाही एक फोटो व्हायरल होत आहे. हा भावूक करणारा फोटो पाहून चाहतेही भावूक झाले आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि २ षटकार मारले होते. तर श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला होता. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १३५ धावा करण्यात यश आले होते.
https://twitter.com/PrabS619/status/1448367712472682500
Prithvi Shaw 🙁 pic.twitter.com/T4ebg7SbKl
— Ryan (@ryandesa_07) October 13, 2021
Feel for this youngies ,they deserved more ,hard luck 💔#KKRvDC pic.twitter.com/2iTISg6es5
— 🎭 (@CloudyCrick) October 13, 2021
Picture of the day for me!
Ricky Ponting, one of the greatest captains the game has ever seen who has won almost everything in Cricket consoling a young Rishabh Pant who came so close of winning the IPL. Thank you Punter ❤️ #IPL2021 #DCvsKKR pic.twitter.com/W24PCC1HRu
— Vinesh Prabhu (@prabhu_vinesh94) October 13, 2021
Pant 💔
Can feel you @RishabhPant17 champ !! Keep the heads high as you & boys figured till the last moment#KKRvDC pic.twitter.com/g8FcABJv0N
— Karthick Shivaraman (Imagine NO Blue tick Here) (@iskarthi_) October 13, 2021
Chin up champ @PrithviShaw . We are proud of you. #DelhiCapitals @DelhiCapitals pic.twitter.com/sKYczXAJOz
— Arpan (@ThatCricketHead) October 13, 2021
How not to cry?
3 consecutive time 🥺😭😭
I trust 💛 you all! Proud of you all, 100% efforts #rishabhpant #shreyasiyer #PrithviShaw #dc #DCvKKR pic.twitter.com/zdCYdhUlxE— Tani (@Spellbounded17) October 13, 2021
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा रोमांचक विजय
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी १३६ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली होती. तर शुबमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले होते. या दोघांनी ९६ धावांची सलामी दिली होती. पण, १५ व्या षटकानंतर कोलकाताने पाठोपाठ विकेट्स गमावल्या.
त्यामुळे शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. या षटकात आर अश्विनने पहिल्या ४ चेंडूवर २ गडी बाद करत १ धाव खर्च केली होती. त्यावेळी कोलकाताला शेवटच्या २ चेंडूंमध्ये ६ धावांची आवश्यकता असताना राहुल त्रिपाठीने षटकार मारून विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: बॅड लक!! गिलनं घेतलेला अविश्वसनीय झेल, पण पंचांनी तो निर्णय दिला अन् हेटमायर ठरला नाबाद
Video: युवराजचे ६ सिक्स ते ऐतिहासिक विजय; टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ४ अविस्मरणीय क्षण