भारतीय क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक सध्या खूप व्यस्त आहे. मायदेशात सुरू असलेली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ५ सामन्यांची टी२० मालिका संपल्यानंतर २६ जून आणि २८ जून रोजी भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर टी२० सामने खेळायचे आहेत. या २ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी १७ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात युवा फलंदाज पृथ्वी शॉ याचे नाव नाही.
२२ वर्षीय शॉ (Prithvi Shaw) वर्षभरापासून भारतीय संघातून (Team India) बाहेर आहे. अशात कमीत कमी आयर्लंडविरुद्ध (Ireland vs India) आपली निवड होण्याची शॉला (Prithvi Shaw) अपेक्षा होती. परंतु पुन्हा एकदा त्याच्यावर दुर्लक्ष केले गेल्याने शॉने संघ निवडकर्त्यांसाठी एक पोस्ट (Prithvi Shaw Instagram Story) केली आहे.
शॉ भारतीय संघाच्या प्रतिभाशाली सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे. परंतु जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळल्यानंतर त्याला या स्वरूपात पुनरागमनाची संधीच मिळालेली नाही. स्वत कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल यांच्या उपस्थितीत त्याच्यासाठी सलामीचे स्थान उपलब्ध नाही. तसेच या प्रमुख सलामीवीरांच्या अनुपस्थितीत इशान किशन आणि ऋतुराज गायकवाडने या स्थानी आपला दावा ठोकला असल्याचे पृथ्वी शॉचा पत्ता कटला आहे.
अशात आयर्लंड दौऱ्यावरही दुर्लक्षित केले गेल्याने पृथ्वी शॉ भावुक झाला आहे. त्याने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली होती. ज्यामध्ये साई बाबांचा फोटो होता आणि त्याच्यावर लिहिले होते की, ‘हार मानू नका, चमत्कार तुमच्या वाटेवर आहे.’
दरम्यान पृथ्वी शॉ आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. त्याच्यासाठी हा हंगाम जास्त खास राहिला नाही. त्याने या हंगामात १० सामन्यांमध्ये केवळ २८३ धावा केल्या आहेत. परंतु त्याच्यासाठी २०२१ सालचा हंगाम उल्लेखनीय राहिला होता. या हंगामात त्याने १५ सामन्यांमध्ये ४७९ धावा केल्या होत्या. भलेही पृथ्वी शॉसाठी आयपीएलचा हंगाम चांगला राहिला नसला तरीही, आयर्लंडविरुद्ध डावलले गेल्यानंतर रणजी ट्रॉफी २०२१-२२ च्या उपांत्य सामन्यात धमाकेदार प्रदर्शन केले. या सामन्यात त्याने ६४ धावांची झंझावाती खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSA T20: अर्शदीप की उमरान कोणाला मिळणार चौथ्या सामन्यात संधी? वाचा भारतीय दिग्गजाने काय सांगितले
चौथ्या सामन्यात भारताला ‘या’ गोष्टींसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार, वाचा काय आहेत संघातील कमतरता
पुणेकर ऋतुराज गायकवाडने उडवली युझवेंद्र चहलची खिल्ली, पाहा व्हिडीओ