श्रीलंका संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या १८ जुलैपासून दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघातील फलंदाज सराव सामन्यात घाम गाळताना दिसून येत आहेत.अशातच युवा फलंदाज पृथ्वी शॉ देखील तुफान फटकेबाजी करताना दिसून आला आहे.
भारतीय संघ येत्या १८ जुलैला श्रीलंका संघाला वनडे मालिकेत पराभूत करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी झालेल्या इंट्रास्क्वाड सराव सामन्याचे हायलाईट्स श्रीलंका क्रिकेटने आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये २१ वर्षीय पृथ्वी शॉ हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलसारख्या अनुभवी गोलंदाजांना चोप देताना दिसत आहेत. (Prithvi shaw shines in intra squad maths hits Indian bowlers very hard fours and six)
पृथ्वी शॉने झळकावले अर्धशतक
या सामन्याचे पूर्ण धावफलक जाहीर करण्यात आले नाही. परंतु व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, पृथ्वी शॉने हवेत बॅट दाखवत जल्लोष साजरा केला आहे. नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजानेही त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हे पाहून असे जाणवत आहे की, पृथ्वी शॉने इंट्रास्क्वॉड सामन्यात अर्धशतक झळकावले आहे.
पृथ्वी शॉ करू शकतो डावाची सुरुवात
श्रीलंकाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत पृथ्वी शॉ सलामी फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. गेल्या काही महिन्यांपासून त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इतकेच नव्हे तर पहिल्या इंट्रास्क्वाड सामन्यात देखील त्याने तुफानी खेळी केल्याचे दिसून आले होते. तसेच शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघासाठी डावाची सुरुवात करतात. त्यामुळे त्याला संधी दिल्या जाण्याच्या दाट शक्यता आहे. या संघात शॉव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड हे दोघे देखील सलामी फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२) दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
महत्त्वाच्या बातम्या-
दिप्तीने चेंडूला हातही न लावता इंग्लंडच्या कर्णधाराला केले धावबाद; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘गजब!’
क्या बात! क्रिकेट खेळून देशसेवा केल्यानंतर, आता ‘हा’ क्रिकेटपटू बनलाय आर्मीमध्ये मेजर
‘गुरुजी इतरांकडून चँपियन बनण्याचे धडे घेतायत’; विम्बल्डन फायनल पाहायला गेलेले शास्त्री झाले ट्रोल