मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी (१८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यादरम्यान सामना खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात दिल्लीने पंजाबला ६ गडी राखून पराभूत केले. यासह दिल्लीने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. या सामन्यात दिल्लीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने ३२ धावांची तुफानी खेळी करून चाहत्यांची मने जिंकली. त्याने मारलेल्या एका षटकाराने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
पृथ्वीचा नेत्रदीपक षटकार
पंजाबच्या फलंदाजांनी रचलेल्या १९६ धावांच्या आव्हानाच्या प्रत्युत्तरात दिल्लीसाठी शिखर धवन व पृथ्वी शहा यांनी मैदानात पाऊल ठेवले. दोघांनीही पहिल्या षटकापासून आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. शॉ नेहमीप्रमाणे जोरदार फटकेबाजी करत होता. त्याने आपल्या छोटेखानी खेळीने दिल्लीला शानदार सुरूवात करून दिली. पृथ्वी १७ चेंडूत ३ चौकार व २ षटकार ठोकून बाद झाला.
यादरम्यान पृथ्वीने झाय रिचर्डसनला मारलेल्या एका षटकाराने सर्वांची मने जिंकली. दिल्लीच्या डावातील चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पृथ्वीने लॉंग ऑफला उत्कृष्ट पदलालित्य व टाइमिंगच्या जोरावर षटकार ठोकला. त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Taukir077/status/1383833277237121037
https://twitter.com/BrutalBhau/status/1383818168821452800
दिल्लीचा दुसरा विजय
केएल राहुल (६१) व मयंक अगरवाल (६९) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात धावफलकावर १९५ धावा लावल्या.
प्रत्युत्तरात, शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला ५.३ षटकात ५९ धावांची सलामी दिली. शॉ ३२ धावा काढून परतल्यानंतरही धवनने आपला आक्रमक पवित्रा सोडला नाही. त्याने, ४९ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९२ धावा बनवत संघाचा विजय निश्चित केला. धवनच सामन्याचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘बर्थडे स्पेशल’ अर्धशतक करत केएल राहुलने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
लाजवाब राहुल! अर्धशतक ठोकताच आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा बनला पहिला फलंदाज
‘उडता डॅनियल!’ बदली फिल्डर म्हणून आलेल्या ख्रिस्टियनने घेतला शुभमन गिलचा घेतला लाजवाब