---Advertisement---

टॉम लॅथमने पृथ्वी शॉचा एकहाती घेतलेला हा भन्नाट झेल पाहिला का?

On: शनिवार, फेब्रुवारी 29, 2020 3:45 PM
---Advertisement---

आजपासून (29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत (NZ Vs IND) संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना (2nd Test Match) सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्याच दिवशी भारताचा पहिला डाव 63 षटकात 242 धावांवर संपुष्टात आला.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. मात्र, पहिल्याच डावात भारताच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. भारताने 33 षटकांच्या आतच 4 विकेट्स गमावल्या.

पण असे असले तरी आज सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने (Prithvi Shaw)  चांगली फलंदाजी करताना 64 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकारासह 54 धावांची खेळी केली. मात्र तो 20व्या षटकात काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा एकहाती सुरेख झेल स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टॉम लॅथमने (Tom Latham) घेतला. 

न्यूझीलंडचा गोलंदाज नील वॅगनरच्या 19व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शॉने अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर तो आक्रमक होऊन फलंदाजी करत होता. पुढे काईल जेमीसनच्या (Kyle Jamieson) 20व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शॉने ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटच्या बाहेरील बाजूस लागला आणि दुसर्‍या स्लिपमध्ये उभा असलेल्या लॅथमने एका हाताने शानदार झेल घेतला.

https://twitter.com/CanterburyCrick/status/1233554782700204032

या सामन्यात पहिल्या डावात शॉ बरोबरच चेतेश्वर पुजारा(54) आणि हनुमा विहारीने(55) अर्धशतकी खेळी केल्या. तसेच या तिघांव्यतिरिक्त केवळ रिषभ पंत(12), मोहम्मद शमी(16) आणि जसप्रीत बुमराह(10) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. अन्य भारतीय फलंदाजांनी निराशा केली.

न्यूझीलंडकडून या डावात काईल जेमिसनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच नील वॅगनरने 1 विकेट घेतली.

त्यानंतर आज पहिल्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात बिनबाद 63 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम 27 आणि टॉम ब्लंडेल 29 धावांवर नाबाद खेळत आहेत.

https://twitter.com/Maha_Sports/status/1233675653184180224

https://twitter.com/Maha_Sports/status/1233644820347920385

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---