---Advertisement---

बेंगलोर-दिल्ली सामन्यात दर्शकांना घडलं सचिनचं दर्शन! पृथ्वी शॉच्या ‘त्या’ कृत्याने रंगली एकच चर्चा

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 8:18 AM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याची बऱ्याचदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्यासोबत तुलना केली जात असते. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत केलेली प्रगती आणि त्याची मुंबईची पार्श्वभूमी यामुळे ही तुलना होत असते.

मंगळवारी (२७ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा २२ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. धाकधूक वाढलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर बेंगलोरने बाजी मारत एका धावेने सामना खिशात घातला. या सामन्यात पृथ्वीने अशी काही कृती केली, ज्यामुळे पुन्हा एकदा त्याची सचिनशी तुलना केली जाऊ लागली आहे.

त्याचे झाले असे की, बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना एबी डिविलियर्सच्या ७५ धावांच्या तूफान खेळीच्या जोरावर दिल्लीपुढे १७२ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी शिखर धवन आणि पृथ्वी ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरली होती. परंतु तिसऱ्या षटकातच धवनला झेलबाद करत बेंगलोरने त्यांची भागिदारी मोडली. तरीही पृथ्वी एका बाजूने चिवट झुंज देत सामना पुढे नेत होता.

अशात डावातील आठव्या षटकात एक खराब फटका खेळून तो बाद झाला. हर्षल पटेलच्या षटकातील दुसरा चेंडू पृथ्वीच्या बॅटची किनार घेत थेट यष्टीरक्षक डिविलियर्सच्या हाती गेला. यावर प्रतिस्पर्धी बेंगलोरचे खेळाडू विकेटचा जल्लोष साजरा करु लागले. परंतु पंचांनी आपला निर्णय दिला नव्हता. तरीही पृथ्वीने क्षणभरही वाट पाहिली नाही आणि तो निराश चेहऱ्यासह पव्हेलियनच्या दिशेने निघाला.

पृथ्वीच्या याच कृतीने सामना दर्शकांचे लक्ष वेधले. अनेकांना त्याच्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू सचिनची झलक पाहायला मिळाली. सचिनही त्याच्या कारकिर्दीदरम्यान बाद झाल्यानंतर पंचांनी आपल्या निर्णय देण्यापुर्वीच स्वत:च मैदान सोडल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे. क्रिकेटरसिकांनी ट्विटरवर याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

https://twitter.com/lodulalit001/status/1387094403752239106?s=20

https://twitter.com/droopyaxe1/status/1387084607372152834?s=20

https://twitter.com/SamiFlies/status/1387086354543112194?s=20

या सामन्यात पृथ्वीने १८ चेंडूंचा सामना करताना २१ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने ३ चौकार मारले.

महत्त्वाच्या बातम्या-

सलाम भावा! फक्त १ धावेने पराभूत झाल्यानंतर पंत आला रडकुंडीला, विराटने ‘अशी’ कृती करत जिंकले मन

RCB vs DC : पंत-हेटमायरची झुंज अपयशी, रंगतदार सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका धावेने विजय

दिल्लीकर विराट नडतोय दिल्लीलाच! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही असेच म्हणाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---