---Advertisement---

दिल्लीकर विराट नडतोय दिल्लीलाच! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही असेच म्हणाल

On: मंगळवार, एप्रिल 27, 2021 11:39 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा विक्रम करतो. आयपीएल २०२१ च्या २२ व्या सामन्यात कोहलीने दिल्लीविरुद्धही विक्रम नोंदविला आहे. दिल्लीचा नागरिक असलेल्या विराटने दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच एक विशिष्ट कामगिरी करण्याचा कारनामा केला. मात्र, या सामन्यात तो केवळ १२ धावा करून बाद झाला.

दिल्लीविरुद्ध केल्या इतक्या धावा पूर्ण
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहलीने ११ चेंडूंत १२ धावा केल्या. त्याला वेगवान गोलंदाज आवेश खानने त्रिफळाचीत केले. विराटने दिल्लीविरुद्ध ९०० धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमधील दुसरा कोणताही फलंदाज या आकड्यापर्यंत पोहोचलेला नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ८६२ धावा बनवून दुसर्‍या क्रमांकावर आहे. इतर कुठल्याही फलंदाजाने ८०० धावांचा पल्ला गाठला नाही.

५७ ची सरासरी आणि १३६ चा स्ट्राईक रेट
विराट कोहलीच्या दिल्लीविरुद्धच्या आयपीएल आकडेवारीविषयी बोलायचे झाल्यास त्याने २४ सामन्यांच्या २३ डावात ५७ च्या सरासरीने ९०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३६ आहे. कोहलीनेही दिल्लीविरुद्ध ८ अर्धशतके झळकावली आहेत. ९९ धावांची खेळी यामध्ये सर्वोच्च आहे. दुसरीकडे रोहित शर्माने २९ डावांमध्ये ८६२ धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ७४ धावा त्याच्या सर्वाधिक राहिल्या आहेत.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाज विराट
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून विराट कोहलीकडे पाहिले जाते. त्याच्याशिवाय इतर कोणताही फलंदाज ६ हजार धावांच्या आकड्यापर्यत पोहोचला नाही. मात्र, सध्याच्या हंगामात कोहलीची कामगिरी समाधानकारक राहिली नाही. कोहलीने ६ सामन्यांच्या ६ डावांमध्ये ३३ च्या सरासरीने १६३ धावा केल्या आहेत. यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे. दुसरीकडे, विराटच्या संघाची कामगिरी मात्र दर्जेदार होतेय.

महत्वाच्या बातम्या:

आयपीएलमध्ये पाच हजारी मनसबदार बनला एबी, सोबतच या यादीत झाला समाविष्ट

RCB vs DC : पंत-हेटमायरची झुंज अपयशी, रंगतदार सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका धावेने विजय

व्हिडिओ : आवेश खानने केली विराटची शिकार, कर्णधार झाला क्लीन बोल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---