भारतीय संघाने कसोटी मालिकेत विंडिजला 2-0 ने पराभूत केले. या मालिकेत पदार्पणातच शतक ठोकत अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शाॅचे सर्वांनीच कौतुक केले आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहली सुद्धा पृथ्वीच्या खेळीने प्रभावित झाला आहे. आॅस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ अजून जाहीर झालेला नाही. त्यापुर्वीच कोहलीने पृथ्वी आॅस्ट्रेलियात सलामीला खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भारतीय फलंदाजांना उसळत्या खेळपट्यांवर खेळताना अडचण होते. यावेळी मात्र भारतीय फलंदाज आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार आहेत, असा दावाही कोहलीने केला आहे.
“18-19 वर्षांचे असताना आपण पृथ्वीच्या 10 टक्केही नव्हतो. पृथ्वी हा कोणत्याही सामन्यात चांगली सुरुवात करून देणारा फलंदाज आहे. त्याची आत्मविश्वास पुर्ण खेळी पाहताना आपल्याला आनंद होतो.” असे कोहली म्हणाला आहे.
पृथ्वीला इंग्लड दौऱ्यात नेटमध्ये फलंदाजी करताना पाहिले होते. तो एक आक्रमक फलंदाज असून वेळ आली तर तो संयमी खेळी देखील करतो, असेही कोहलीने अधोरेखीत केले.
कोहलीच्या वक्तव्यावरून त्याला पृथ्वी या दौऱ्यात भारतीय संघात हवाच असल्याचे स्पष्ट होते.
या दौऱ्यात भारतीय संघ चार कसोटी, तीन वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे.
सध्या पृथ्वीला वन-डे संघात घ्यावे अशी जोरदार मागणी माजी खेळाडू तसेच चाहते करत आहे. विंडीजविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या तीन सामन्यात त्याला संधी मिळू शकते. परंतू असे झाले नाही तर आॅस्ट्रेलिया दौरा शाॅसाठी २०१९ विश्वचषकाची दारं उघडणारा ठरु शकतो.
महत्वाच्या बातम्या-
- ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष
- पृथ्वी शॉ, रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप
- या कारणामुळे भुवनेश्वर कुमार माध्यमांवर बरसला