सिडनी | बहुचर्चित भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापुर्वी कालपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध क्रिकेट आॅस्ट्रेलिया ११ सामन्यात आज पृथ्वी शाॅने शानदार सलामी दिली.
त्याने केएल राहुलबरोबर सलामीला येताना ६९ चेंडूत ६६ धावा केल्या. यात ११ चौकारांचा समावेश होता.
केएल राहुल तीन धावांवर बाद झाल्यावर शाॅने दुसऱ्या विकेटसाठी पुजाराबरोबर ८० धावांची चांगली भागीदारी केली.
६६ धावांवर खेळत असताना त्याला डॅनियल फॅलिन्सने त्रिफळाचीत केले. दुसऱ्या बाजूला पुजारा (५४) आणि विराट कोहली (६४) वर बाद झाले. तर सध्या अजिंक्य रहाणे ३५ तर हनुमा विहारी ५२ धावांवर खेळत आहे.
या महिन्यात शाॅने मुंबई तसेच भारत अ कडून चांगली कामगिरी केली आहे. हा १९ वर्षीय खेळाडू आॅस्ट्रेलिया दौरा गाजविण्यासाठी सज्ज झाला आहे. तसेच या मालिकेत चांगली कामगिरी करुन वन-डेसाठी आपण प्रबष दावेदार आहोत हेही तो सिद्ध करण्यासाठी नक्कीच उत्सुक असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पोस्टर बॉय राहुल चौधरीचा प्रो कबड्डीमध्ये भीमपराक्रम
–हॉकी विश्वचषक २०१८: भारताचे दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व कायम
–हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची विजयी सुरूवात
–Video: गोलंदाजांना सराव देताना तोल गेल्याने स्मिथ पडला खाली