---Advertisement---

“… तरच पृथ्वी शॉ करू शकेल भारतीय संघात पुनरागमन, इयान बिशप यांनी सांगितला पर्याय

On: मंगळवार, जानेवारी 26, 2021 4:52 PM
---Advertisement---

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शाॅसाठी ऑस्ट्रेलिया दौरा अतिशय वाईट ठरला. आयपीएल स्पर्धेतही पृथ्वी विशेष चमक दाखवू शकला नाही. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरही त्याचा खराब फॉर्म कायम राहिला.

त्यामुळे पहिल्या कसोटीनंतर संघातून वगळण्यात आले. आता संघात पुनरागमन करण्यासाठी वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज इयान बिशप यांनी पृथ्वीला सल्ला दिला आहे. पृथ्वीला देशांतर्गत क्रिकेट मध्ये धावा काढण्याबरोबरच तंत्रावरही मेहनत घ्यावी लागेल, असे बिशप म्हणाले.

“तंत्रात करावी लागेल सुधारणा”

पृथ्वीने आत्तापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५१.४३ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. परंतु बिशप यांच्या मते पृथ्वीला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी आपल्या तंत्रात सुधारणा करावी लागेल. विशेषतः गतिमान आणि उसळी घेणार्‍या खेळपट्ट्यांवर त्याला तंत्र सुधारवावे लागेल. कारण ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर त्याच्या तंत्रातील दोष उघडे पडले.

बिशप म्हणाले, “मी काही फलंदाजीतील तज्ञ नाही. त्यामुळे नक्की कशा प्रकारे सुधारणा करता येईल हे मी नाही सांगू शकत. मात्र यातील तज्ञ व्यक्ति हे सांगू शकतात. पण आता हे नक्की, की पृथ्वी शॉला पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतून भरपूर धावा काढाव्या लागतील.”

पृथ्वीला स्विंग होणार्‍या चेंडूंसमोर खेळण्याची पद्धत सुधारावी लागेल, असेही बिशप यावेळी म्हणाले. सलामी फलंदाजाला स्विंग गोलंदाजी उत्तमरीत्या खेळता येणे आवश्यक आहे, कारण नवीन चेंडू कायमच स्विंग होत असतो, असे बिशप यांनी सांगितले.

दरम्यान, पृथ्वी शॉला त्याच्या खराब फॉर्ममुळे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतूनही वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी संघात स्थान देण्यात आलेल्या शुबमन गिलने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे पृथ्वीला संघात पुनरागमन करायचे असल्यास कडवी मेहनत करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

होय, पक्काच..! चेन्नईतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाच जिंकणार? असं आम्ही नाही हे आकडे सांगतायेत

केएल राहुल आणि प्रेयसी अथिया शेट्टीतील जवळीक वाढली, डिनर डेटचे फोटो तूफान व्हायरल

सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल जो रूट, माजी दिग्गजाची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---