अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर शुक्रवारी (६ नोव्हेंबर) आयपीएल २०२०चा इलिमिनेटर सामना झाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात ही ‘करा अथवा मरा’ची लढत झाली. या लढतीच्या पावरप्लेमध्ये हैदराबाद संघाचे जबरा क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. दरम्यान हैदराबादच्या युवा खेळाडू प्रियम गर्गने तर एक अफलातून झेलही घेतला.
झाले असे की, नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने गोलंदाजी निवडली आणि बेंगलोरला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्यामुळे बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि युवा फलंदाज देवदत्त पडीक्कल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. मात्र सामन्याच्या दूसऱ्या षटकातच विराट पव्हेलियनला परतला. तरीही या हंगामात ५ अर्धशतके लगावणारा पडीक्कल संघाचा डाव पुढे नेईल अशी सर्वांना अपेक्षा होती.
परंतु, डावातील चौथ्या षटकात गोलंदाजीला आलेल्या जेसन होल्डरने प्रियम गर्गच्या हातून त्याला झेलबाद केले. होल्डरच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पडीक्कलने मागे सरकून जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण पडीक्कलच्या अपेक्षेप्रमाणे चेंडू बॅटला लागला नाही. याचा फायदा घेत, मिड ऑफला क्षेत्ररक्षणासाठी थांबलेल्या गर्गने चपळतेने वर उडी घेतली आणि दोन्ही हातांनी चेंडू झेलला. त्यामुळे ६ चेंडूत केवळ १ धाव करत पडीक्कलला मैदानाबाहेर जावे लागले.
गर्गच्या या अप्रतिम झेलमुळे हैदराबादने ४ षटकांच्या आतच बेंगलोर संघाची स्थिती २ बाद १५ धावांवर आणली. बेंगलोरने या सामन्यात २० षटकात १३१ धावा केल्या आणि हैदराबादला १३२ धावांचे आव्हान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
दोघांनीही गुरुवारी साजरा केला आपला वाढदिवस, एकाने दाखवला दुसऱ्याला तंबूचा रस्ता
मुंबई इंडियन्सच्या यशाआड झाकलं जातंय कर्णधार रोहित शर्माचं अपयश?
प्ले ऑफला हैदराबादविरुद्ध नुसता संघ जाहीर करुनही विराटने केला खतरनाक विक्रम
ट्रेंडिंग लेख-
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा