---Advertisement---

क्रीडा भारती पुणे महानगर आयोजित ‘मेजर ध्यानचंद शालेय वकृत्व स्पर्धे’चे बक्षीस वितरण

On: शुक्रवार, सप्टेंबर 3, 2021 9:23 AM
---Advertisement---

खेळातून चारित्र्य निर्माण करावयाचे व चरित्रातून राष्ट्राची निर्मिती करावयाची, या उक्तीनुसार 1992 मध्ये क्रीडा भारतीची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था 2009 सालापासून अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असून 528 जिल्ह्यांमध्ये क्रीडा भारतीचे कार्य चालू आहे. लहानांपासून वरिष्ठांपर्यंत सर्व लोकांनी नियमितपणे क्रीडांगणावर यावे क्रीडांगणावर खेळावे आणि खेळातील आनंद उपभोगा व व्यायाम करावा या उद्देशाने क्रीडा भारती कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत असते. समाजातील व्यक्ती क्रीडांगणावर येऊन खेळल्यास त्यांचे आरोग्य सुधारेल,  त्यांचे आरोग्य सुधारले म्हणजे समाजाचे आरोग्य सुधारेल, आणि समाजाचे आरोग्य सुधारले म्हणजे देशाचे आरोग्य सुधारेल ही क्रीडा भारती ची धारणा आहे. क्रीडा भारती चे कार्यक्रम पंचसूत्रीच्या आधारे संपूर्ण देशभर आयोजित करण्यात येत असतात.  या पंचसुत्री पैकी 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन हा दिवस क्रीडा भारतीच्या वतीने संपूर्ण देशभर साजरा करण्यात येतो.

क्रीडा भारती पुणे महानगराच्या वतीने देखील 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिना प्रीत्यर्थ शालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 28 शाळांनी सहभाग नोंदवून दोन 2000 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 1 सप्टेंबर 2021 रोजी वीर पासलकर सभागृह सिंहगड रोड या ठिकाणी सायंकाळी 4.00 वाजता आयोजित करण्यात आला होता.

तसेच नगरसेवक प्रसन्न दादा जगताप यांनी “आज शिवाजी महाराज असते तर..” या विषयावर निबंध स्पर्धा घेतली होती. याही निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण याच कार्यक्रमात करण्यात आला. विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या समारंभास क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री, श्री राजजी चौधरी, श्री विजय पुरंदरे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष, पुण्याचे सिंहगड भागातील नगरसेवक व माजी उपमहापौर श्री  प्रसन्न दादा जगताप आणि नगरसेविका ज्योतीताई गोसावी, क्रीडा भारती के अखिल भारतीय कार्यालयीन प्रमुख व पुणे महानगराचे मंत्री श्री विजय राजपूत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राधिका मंडलिक व आरती गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा भारती पुणे महानगराचे अध्यक्ष श्री शैलेश आपटे यांनी केले. अध्यक्षीय मनोगत श्री राजजी चौधरी, क्रीडा भारती अखिल भारतीय महामंत्री यांनी केले. तर आभार प्रदर्शन  श्री आनंद कंदलगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जयसिंग जगताप, सहमंत्री क्रीडा भारती पुणे महानगर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---