अहमदाबाद। शनिवारी (६ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना भारतीय संघाने एक डाव आणि २९ धावांनी जिंकला. मालिकेतील हा शेवटचा सामना जिंकून भारताने इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका ३-१ अशा मोठ्या फरकाने जिंकली. याचबरोबर भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँमियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या मालिकेत भारतीय कसोटी संघाकडून पदार्पण केलेला अक्षर पटेल हा गोलंदाज खूपच चमकला. जेवढी या मालिकेत अक्षरच्या कामगिरीची चर्चा झाली तेवढीच मालिकेतील शेवटच्या दिवशी त्याच्या गॉगलचीही चर्चा झाली. अगदी या गॉगलच्या ब्रँंडपासून ते त्याच्या किंमतीपर्यंत अनेकांनी त्यांची मतं सोशल मीडियावर व्यक्त केली.
भारताच्या या मालिका विजयात अक्षरने सिनीयर फिरकीपटू आर अश्विनच्या खांद्याला खांदा लावून गोलंदाजी केली. त्याने या कसोटी मालिकेत मिळून ३ सामन्यात १०.५९ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने ४ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
याच अक्षरच्या गॉगलच्या चर्चेला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला तो जेष्ठ उद्योजक आनंद महिंद्रा यांनी. भारतीय संघाचे कौतूक करताना आनंद महिंद्रा यांनी एक खास ट्विट केला होता. ‘झालं सर्व! मालिका खिशात घातली. भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ मला हे सनग्लासेस घेण्याची गरज आहे. ते कोणत्या ब्रँडचे आहेत आणि मला ते कुठे मिळतील?’, असा ट्विट त्यांनी केला होता.
Ok. Done & dusted. Series win in the pocket. 👏👏👏Now I need to get these sunglasses to commemorate the victory. Which brand are they and where can I get them? pic.twitter.com/zp4bbyzPl8
— anand mahindra (@anandmahindra) March 6, 2021
हा फोटो भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा आहे. यात त्याने रंगीबेरंगी कलरचा गॉगल घातला असून त्याला व्हाईट दांड्या आहेत. अश्विन क्रिष्णन नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने हा गॉगल ओक्ले रडार ईडब्लू असल्याचे सांगितले आहे. तसेच अश्विन ओक्ले इंडियाच्या मार्केटिंग टीममध्ये स्पोर्ट्स विभागाचा प्रमुख असल्याचेही त्याने ट्विटमध्ये सांगितले आहे. जर आनंद महिंद्रा यांनी पत्ता पाठवला तर तो महिंद्रांना एक किंवा दोन गॉगल पाठवायलाही तयार असल्याचे तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतोय.
Dear Sir. These are Oakley sunglasses. This particular model is the Radar EV. I work with Oakley and will be glad to send across a pair or two to you if you could provide me with a contact address. This is Ashwin Krishnan here and I Head Sports Marketing for Oakley in India.
— Ashwin Krishnan (@AshtagSport) March 6, 2021
ओक्ले रडार ईव्ही गॉगलची ओक्लेच्या वेबसाईटवर तसेच अन्य ई कॉमर्स वेबसाईटवर किंमत अंदाजे १० हजार ते २० हजांराच्या दरम्यान आहे. हा गॉगल खासकरुन स्पोर्ट्समन व सायकलिस्ट वापरताना दिसतात.
यापुर्वीही झालीय खेळाडूंच्या गॉगलची चर्चा-
यापुर्वीही अनेक फिरकीपटू हे गोलंदाजी करताना गॉगल वापरत असे. भारतीय खेळाडूंमध्ये मुरली कार्तिक, युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग किंवा सचिन तेंडूलकर यांना गॉगल घालून गोलंदाजी करताना चाहत्यांनी पाहिले आहे. क्लाइव्ह लॉयड, डेनियल विटोरी, विरेंद्र सेहवाग, दिलीप दोशी किंवा नरेंद्र हिरवाणी सारखे क्रिकेटर चष्मा घालून क्रिकेट खेळले होते. २०१९ ऍशेस कसोटी मालिकेत बेन स्टोक्सबरोबर सुंदर फलंदाजी करत सामना जिंकून देणाऱ्या फिरकीपटू जॅक लीचला स्पेकसेवर्स या कंपनीने अजीवन चष्मा मोफत देण्याचे कबूल केले होते.
हेही वाचा- चष्मा घालून खेळणारे १० दिग्गज क्रिकेटपटू