मुंबई | प्रो-कबड्डीच्या ६व्या हंगामात विशाल माने दबंग दिल्ली संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याला ४५ लाख रुपयांना दिल्लीने आपल्या संघात घेतले आहे.
३३ वर्षीय विशाल पहिले ३ हंगाम मुंबईकडून खेळला असुन चौथा बंगाल तर पाचवा पाटणाकडून खेळला आहे.
तो या हंगामाच्या लिलावासाठी B कॅटगिरीमध्ये होता. त्यामुळे त्याची बेस प्राईज १२ लाख होती. त्यानंतर ही बोली वाढत १५ लाखांवर गेली. अखेर ही बोली सर्वच संघांनी विशालला संघात घेण्यासाठी मोठी चुरस दाखवली. परंतु दिल्लीने त्याला ४५ लाखांना आपल्या संघात घेतले.
५ हंगामात हा खेळाडू ८३ सामने खेळला असुन त्यात त्याने १३२ गुण टॅकलमधून घेतले आहे. राईट कव्हरमध्ये खेळण्यासाठी तो ओळखला जातो.
२०१८मध्ये तो फेडरेशन कपमध्ये महाराष्ट्राकडून खेळला होता. या स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी राहिला होता.
वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या-
-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख
-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली
-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती
-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू
–आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली








