प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या तिसऱ्या दिवशी (२४ डिसेंबर) तिसरा सामना हा ‘बंगाल वॉरियर्स’ आणि ‘गुजरात जायंट्स’ संघात झाला. बंगाल वॉरियर्सने ३१-२८ च्या फरकाने या सामन्यात बाजी मारली आहे. हा त्यांचा हंगामातील सलग दुसरा विजय आहे.
Thigh hold and Ravinder Pahal – ek an-Hawk-i prem katha! ❤️#BENvGG #SuperhitPanga #vivoProKabaddi pic.twitter.com/98PxrZlBUb
— ProKabaddi (@ProKabaddi) December 24, 2021
हेही वाचा- प्रो कबड्डी २०२१ : ‘दबंग दिल्ली’ ठरली ‘यू मुंबा’वर भारी, जोरदार पुनरागमनासह ३१-२७ ने जिंकला सामना
असे राहिले आजचे सामने
यापूर्वी तिसऱ्या दिवसाचा दुसरा सामना ‘तमिल थलाईवाज’ आणि ‘बंगळुरू बुल्स’ संघात झाला. बंगळुरू बुल्सने ३८-३० च्या फरकाने या सामन्यात बाजी मारली आहे. यासह त्यांनी हंगामातील त्यांचे विजयाचे खातेही उघडले आहे.
तत्पूर्वी यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली, या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये यू मुंबाने दबंग दिल्लीवर आघाडी घेतली होती. ते १२-१० ने सामन्यात पुढे होते. मात्र पुढे दबंग दिल्लीच्या कबड्डीपटूंनी सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि प्रतिस्पर्धांच्या मनोबल खच्ची करायला सुरुवात केली. परिणामी सामना दबंग दिल्लीच्या बाजूने वळला आणि त्यांनी ३१-२७ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली आहे. हा त्यांचा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय आहे.
महत्वाच्या बातम्या :
अविष्का फर्नांडोचा ‘फायनल धमाका’! जाफना किंग्स सलग दुसऱ्यांदा लंका प्रीमियर लीगचे ‘चॅम्पियन’
भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट संबंधांना तीन दशके पूर्ण; दोन्ही बोर्ड करतायेत खास तयारी