---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१: ‘पिंक पँथर्स’च्या पारड्यात पडला पहिला विजय, ‘हरियाणा स्टिलर्स’ला चारली पराभवाची धूळ

On: शनिवार, डिसेंबर 25, 2021 10:47 PM
Pink Panthers vs Haryana Steelers
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौथ्या दिवशी (२५ डिसेंबर) तिसरा सामना ‘पिंक पँथर्स’ आणि ‘हरियाणा स्टिलर्स’ संघात झाला. पिंक पँथर्सने ४०-३८ च्या फरकाने या सामना जिंकला. हा त्यांचा हंगामातील पहिला विजय आहे. 

पुणेरी पलटनने उडघले विजयाचे खाते

यापूर्वीचा चौथ्या दिवसातील दुसरा सामना हा ‘पुणेरी पलटन’ आणि ‘तेलुगू टायटन्स’ संघात झाला. शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक वाढवलेल्या या सामन्यात पुणेरी पलटणने ३४-३३ च्या फरकाने बाजी मारली आणि स्पर्धेतील त्यांचे विजयाचे खाते उघडले आहे.

तत्पूर्वी पटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात झालेल्या चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये पटणा पायरेट्स यूपी योद्धांपेक्षा ३ गुणांनी आघाडीवर होता. त्याने पहिल्या हाफअंती २०-१७ ने आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या हाफमध्ये यूपी योद्धांनी जबरदस्त प्रदर्शन करत सामन्यात पुनरागमन केले. एकवेळ ३ गुणांनी मागे असलेल्या यूपी योद्धांनी पटणा पायरेट्ससोबत २५-२५ ने बरोबरी साधली होती. पुढे हेच प्रदर्शन कायम ठेवत त्यांनी  ३६-३५ च्या फरकाने सामन्यात बाजी मारली आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तानपुढे पुन्हा भारताची शरणागती! अंडर-१९ आशिया चषकात असा गमावला हातातला सामना

प्रो कबड्डी २०२१: ‘पुणेरी पलटन’ने उघडले विजयाचे खाते, ‘तेलुगू टानटन्स’वर मिळवला थरारक विजय

प्रो कबड्डी २०२१: यूपी योद्धांचा जबरदस्त विजय, पटणा पायरेट्सवर ३६-३५ च्या फरकाने केली मात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---