PKL 10: प्रो कबड्डी 10 स्पर्धेत बुधवारी (दि. 6 डिसेंबर) 2 सामने खेळले गेले. यातील दुसरा आणि स्पर्धेचा 9वा सामना यूपी योद्धा विरुद्ध हरियाना स्टीलर्स संघात अहमदाबादेत पार पडला. या सामन्यात यूपीने हरियाणा संघाचा 57-27 अशा तब्बल 30 गुणांनी पराभव केला. यासह प्रो कबड्डी 2023 स्पर्धेतील आपला पहिला विजयही मिळवला. या सामन्यात परदीप नरवाल याने विक्रमी प्रदर्शन केले.
यूपी योद्धा (UP Yoddhas) संघाकडून रेडिंगमध्ये परदीप नरवाल (12) आणि सुरेंदर गिल (13) यांनी सुपर 10 पूर्ण केले. डिफेन्समध्ये सुमित सांगवान (8) आणि गुरदीप (5) यांनी हाय 5 केले. हरियाणा स्टीलर्स (Haryana Steelers) संघासाठी रेडिंगमध्ये विनयने सर्वाधिक 5 पॉईंट्स, तर डिफेन्समध्ये मोहित नंदलने 4 टॅकल पॉईंट्स घेतले.
फॉर्ममध्ये परतला परदीव नरवाल
यूपी योद्धा संघाने पहिल्या हाफनंतर 29-14ने आघाडी घेतली होती. सुरुवातीपासूनच यूपीने हरियाणावर दबदबा कायम ठेवत कोणतीच संधी दिली नव्हती. यादरम्यान पदरीप नरवाल (Pardeep Narwal) याने दुसऱ्या रेडमध्ये प्रो कबड्डी 2023 (Pro Kabaddi 2023) स्पर्धेतील पहिला रेड पॉईंट मिळवला. त्याने सुरेंदर गिल आणि डिफेन्सची चांगली साथ मिळाली. त्यामुळे 12व्या मिनिटाला पहिल्यांदा यूपीने हरियाणाला सर्वबाद केले. यानंतरही यूपीचे पारडे जड राहिले. हरियाणाने काही वेळा पलटवार करण्याचा प्रयत्न केला, पण यूपीच्या डिफेंडर्सपुढे त्यांचा डाव फिका पडला. सामन्याच्या 17व्या मिनिटाला दुसऱ्यांदा हरियाणा संघ सर्वबाद झाला.
पहिल्या हाफप्रमाणे दुसऱ्या हाफमध्येही यूपी योद्धाचे पारडे जड पाहायला मिळाले. यूपीने हरियाणाला दोन वेळा सर्वबादही केले. यूपीचे दोन धुरंधर रेडर परदीप नरवाल आणि सुरेंदर गिल यांनी त्यांचे सुपर 10 पूर्ण केले. डिफेन्समध्ये सुमित सांगवान आणि गुरदीपने आपला हाय 5 पूर्ण केले. हरियाणाचा कोणताही रेडर दुसऱ्या हाफमध्ये कमाल करू शकला नाही. सिद्धार्थ देसाई याचे न चालणेही संघाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. संघाने बरेच सब्स्टिट्यूट वापरले, पण त्यांनाही खास प्रदर्शन करता आले नाही.
शेवटी, यूपीएने 30 पॉईंट्सच्या मोठ्या फरकाने सामना खिशात घातला. तसेच, ते प्रो कबड्डी 2023 (PKL 2023) स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचले. ‘डुबकी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या परदीप नरवालने त्याच्या कारकीर्दीतील 80वा सुपर 10 (Pardeep Narwal 80th Super 10) पूर्ण केले. हरियाणा स्टीलर्स संघ एक विजयासह 12 व्या स्थानी आहे. दोन्ही संघ त्यांचा पुढील सामना 9 डिसेंबर रोजी खेळतील. (pro kabaddi 2023 up yoddhas won against haryana steelers by 30 points in 9th match pkl 10 pardeep narwal 80th super 10)
हेही वाचा-
PKL 2023: पवनचे ऐतिहासिक प्रदर्शन ठरले व्यर्थ, पटना पायरेट्सचा तब्बल 22 गुणांनी दणदणीत विजय
Pro Kabaddi 10: मनिंदरच्या अफलातून प्रदर्शनाने बंगालचा रोमांचक विजय, बेंगळुरू बुल्सचा सलग दुसरा पराभव