प्रो कबड्डी लीग २०२१-२२ (Pro Kabaddi League) हंगामाची सुरुवात बुधवारी (२२ डिसेंबर) झाली असून गुरुवारी (२३ डिसेंबर) सहावा सामना हरियाणा स्टिलर्स विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात प्रशांत कुमार कर्णधार असलेल्या पटना पायरेट्सने हरियाणा स्टिलर्सला पराभवाचे पाणी पाजले. अटीतटीच्या लढतीत पटना पायरेट्सने ४२-३९ गुणांच्या फरकाने विजय मिळवत स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात केली. या विजयासह पटना पायरेट्सने गुणतालिकेत ५ गुणांची कमाई केली.
या सामन्यात पटना पायरेट्स संघाच्या स्टार रेडर मनू गोयतने सुपर टेन पूर्ण केला. त्याने या सामन्यात १५ गुण मिळवले. त्याच्याशिवाय कर्णधार प्रशांत कुमार आणि सचिनने देखील चांगली कामगिरी करताना प्रत्येकी ७ गुण मिळवले. हरियाणाकडून कर्णधार विकास खंडोला आणि अष्टपैलू रोहित गुलिया यांनी चांगली कामगिरी केली. पण, ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत खंडोलाने एकूण ६ आणि रोहितने १० गुण मिळवले.
Monu ka Super 10 and Nada ka comeback!
Isko kehte hai cult classic ????Patna Pirates beat Haryana Steelers to end Day 2's #SuperhitPanga on a high!#HSvPAT #vivoProKabaddi pic.twitter.com/rs1zxbJrBg
— ProKabaddi (@ProKabaddi) December 23, 2021
या सामन्यात मध्यंतरापर्यंत हरियाणा स्टिलर्सकडे २२-१८ अशा गुणांची आघाडी होती. मात्र, उत्तरार्थात पटना पायरेट्सने चांगली कामगिरी करत पिछाडी भरून काढली आणि सामन्यात दमदार पुनरागमन केले. याबरोबरच पटनाने सामनाही आपल्या खिशात घालत हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
अधिक वाचा – प्रो कबड्डी २०२१: दबंग दिल्लीचा पुणेरी पलटनला पराभवाचा धक्का, नवीन कुमार ठरला विजयाचा नायक
गुरुवारी हरियाणा स्टिलर्स आणि पटना पायरेट्स (Haryana Steelers vs Patna Pirates) सामन्यापूर्वी गुजरात जायंट्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स आणि दबंग दिल्ली केसी विरुद्ध पुणेरी पलटन हे दोन सामने पार पडले. गुजराजने ३४-२७ अशा गुणांच्या फरकाने सामना जिंकला. तसेच दबंग दिल्लीने पुणेरी पलटनला ४१-३० गुणांच्या फरकाने पराभूत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: गुजरात जायंट्सची विजयाने सुरुवात; जयपूर पिंक पँथर्सला पाजले पराभवाचे पाणी
क्लब कबड्डी ते प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास करणारा कल्याणचा ‘पोस्टर बॉय’ श्रीकांत जाधव
प्रो कबड्डी २०२१ : ‘बंगाल वाॅरियर्स’चा ‘युपी योद्धा’ संघाला दणका, ३८-३३च्या फरकाने सामना घातला खिशात






