---Advertisement---

प्रो कबड्डी लिलावात सलग दुसऱ्यांदा हा खेळाडू झाला करोडपती

On: मंगळवार, एप्रिल 9, 2019 1:00 PM
---Advertisement---

प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमाचा लिलाव सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. या लिलावात पुणेरी पलटनकडून 6 व्या मोसमात शानदार कामगिरी करणाऱ्या नितीन तोमरवर सलग दुसऱ्या वर्षी कोटीमध्ये बोली लागली आहे.

त्याच्यावर आज या लिलावात तमिळ थलायवाजने 1 कोटी 20 लाखांची बोली लावत खरेदी केले होते. परंतू पुणेरी पलटनने एफबीम(फायनल बीड मॅच) कार्ड वापरुन नितीनला पुण्याच्या संघातच कायम केले. त्यामुळे आता प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमातही नितीन पुणेरी पलटनकडूनच खेळताना दिसणार आहे.

पुणेरी पलटनने प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमातील लिलावातही नितीनसाठी 1 कोटी 15 लाख रुपये मोजले होते. त्यानेही पुण्याच्या संघाला नाराज न करता 6 व्या मोसमात चांगली कामगिरी केली होती.

त्याने 6 व्या मोसमात पुण्याकडून खेळताना 11 सामन्यात 102 गुण मिळवले होते. तसेच प्रोकबड्डीमध्ये आत्तापर्यंत त्याने 53 सामने खेळले असून 394 गुण मिळवले आहेत.

प्रो कबड्डीच्या या लिलावाला कालपासून(8 एप्रिल) सुरुवात झाली आहे. या लिलावाची आज सांगता होणार आहे. 7 व्या मोसमाच्या या लिलावातील आत्तापर्यंत सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.  त्याला तेलगू टायटन्सने 1 कोटी 45 लाखांची बोली लावत संघात घेतले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment