---Advertisement---

तमिल थलाइवाजाच्या यशाची मालिका सुरूच! हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात

On: सोमवार, जानेवारी 10, 2022 8:27 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१-२०२२ मध्ये सोमवारी (१० जानेवारी) पहिला सामना तमिल थलाइवाज विरुद्ध हरियाणा स्टीलर्स असा सामना रंगला. या सामन्यात तमिल संघाने मागील सहा सामन्यांपासून असलेला आपला जबरदस्त फॉर्म कायम राखत आणखी एका विजयाची नोंद केली. तामिळनाडूने सामन्यात ४५-२६ असा विजय साजरा केला.

सामना सुरू होताच तमिल संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी पहिल्या हाफमध्ये हरियाणा संघाला दोनदा ऑल आउट करण्याचा कारनामा केला. तमिल संघ पहिल्या १२ मिनिटात २०-६ अशाच मोठ्या आघाडीवर होता. मात्र, हरियाणा ने शानदार पुनरागमन करत पहिल्या हाफच्या अखेरीस ही आघाडी २४-१८ अशी कमी केली. तमिल संघाचा डिफेंडर सागरने पहिल्या हाफमध्येच हाय फाईव्ह मिळवला.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला हरियाणा संघ तिसऱ्यांदा ऑल आऊट झाला. सुरजीत व सागर यि डिफेंडर जोडीने हरियाणाच्या एकाही रेडरला मान वर काढून दिली नाही. सुरजीतने त्याने व सागर यांनी संपूर्ण सामन्यात मिळून १५ गुण मिळवले. त्यांना अजिंक्य पवार व के प्रभंजन या रेडर जोडीने सुयोग्य साथ दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---