---Advertisement---

प्रो कबड्डी लीगमध्ये सलामीच्या लढतीत दबंग दिल्लीची धडाकेबाज सुरुवात, यु मुंबावर सहज मात

---Advertisement---

प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सलामीच्या लढतीत गतविजेत्या दबंग दिल्ली के सी संघाने माजी विजेत्या यु मुंबा संघाचा ४१-२७ असा पराभव करुन धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात त्यांनी शानदार खेळाचा प्रत्यय घडविला.

या स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाचा कांतीरवा स्टेडियममध्ये शुक्रवारी (7 ऑक्टोबर) प्रारंभ झाला. यु मुंबा संघाच्या गुमानसिंह याने पहिल्याच चढाईत एक गुण वसूल करीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली मात्र त्याचा हा आनंद क्षणिक ठरला. कारण त्यानंतर दिल्ली संघाच्या नवीन कुमार याच्या खोलवर चढायांच्या जोरावर दिल्ली संघाने सतत गुण वसूल करीत पूर्वार्धात वर्चस्व गाजविले.तेराव्या मिनिटालाच त्यांनी पहिला लोण चढविला.

त्यांनी पूर्वार्धात १९-१० अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. दिल्ली संघाच्या संदीप कुमार धूल याने उत्कृष्ट पकडी करीत कौतुकास्पद कामगिरी केली.

उत्तरार्धातही दिल्ली संघाच्या खेळाडूंनी खोलवर चढाया आणि अचूक पकडी करीत आघाडी कायम राखली. मुंबा संघाच्या खेळाडूंनी दोन-तीन वेळा सुपर टॅकल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. मुंबा संघाच्या गुमान सिंग यांनी चांगल्या चढाया करीत नियमित गुणांबरोबरच बोनस गुणही मिळविले.

सामन्यातील शेवटची पाच मिनिटे बाकी असताना दिल्ली संघाकडे ३४-२३ अशी आघाडी होती. ही आघाडी कमी करण्यासाठी मुंबा संघाच्या खेळाडूंनी आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांचे हे प्रयत्न असफल ठरले. नवीन कुमार आणि आशू मलिक यांनी संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मुंबई संघाकडून जय भगवान याचे प्रयत्न अपुरे ठरले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
१६ वर्षांखालील कुमार हॉकी | एसजीपीसीने पटकावले विजेतेपद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---