पुणे: एसएनबीपी संस्थेच्या वतीने आयोजित १६ वर्षांखालील कुमार हॉकी स्पर्धेत अमृतरच्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) संघाने विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी ध्यानचंद अकादमी संघाचा ४-१ असा पराभव केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांचा खेळ समान झाला. सामन्याच्या ३७व्या मिनिटाला ध्यानचंद अकादमी संघाने आपले खाते उघडले. कृष्णा मोहन याने ३७व्या मिनिटाला गोल केला. मात्र, त्यांचा आनंद फारकाळ टिकला नाही. साहिबप्रीत सिंगने ४४व्या मिनिटाला गोल करून एसजीपीसी संघाला बरोबरी साधून दिली.
उत्तरार्धात मात्र, एसजीपीसी संघाने कमालीचा वेगवान खेळ करताना ध्यानचंद अकादमी संघाच्या बचावफळीवर सातत्याने दडपण टाकले. उत्तरार्धात सुरुवातीलाच ४५व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर सुखराज सिंगने संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर दोन मिनिटांत दोन गोल करून एसजीपीसी संघाने विजेतेपदावर नाव कोरले. प्रथम ५८व्या मिनिटाला गुरारिश सिंग, तर ५९व्या मिनिटाला कर्णधार जगजीत सिंगने गोल केला.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत अन्वर हॉकी सोसायटी संघाने यजमान एसएनबीपी अकादमी संघाचा ६-२ असा पराभव केला.
वैयक्तिक पारितोषिके
गोलरक्षक – राहुल पाल (ध्यानचंद अकादमी)
बचावपटू – गुरकित सिंग (एसजीपीसी)
मध्यरक्षक – विशाल पांडे (ध्यानचंद अकादमी)
आक्रमक – आकाश पाल (ध्यानचंद अकादमी)
स्पर्धेचा मानकरी – अरबाझ (ध्यानचंद अकादमी)
निकाल –
एसजीपीसी, अमृतसर ४ (साहिप्रीत सिंग ४४वे, सुखराज सिंग ४५वे, गुरारिश सिंग ५८वे, जगजित सिंग ४५ वे मिनिट) वि.वि. ध्यानचंद अकादमी १ (कृष्णा मोहन ३७वे मिनिट)
तिसरा क्रमांक – अन्वर हॉकी सोसायटी ६ (शाहरुख अली ३रे, ४९वे मिनिट, केतन कुशवा २४वे मिनिट, दिपू रावत २७वे मिनिट, शेखर धौनक ३०वे मिनिट,. आशिष कुमार ५७वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी अकादमी २ (विघ्नेस बिऱ्हा ३२वे, अमृत पावरा ३९वे मिनिट)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हा तर भारतीय जर्सीतील शोएब मलिक…’, एमएस धोनीचा मेणबत्तीचा पुतळा पाहून चाहत्यांची सटकली
आता विरोधकांची खैर नाही! विश्वचषकापूर्वी शाहीन आफ्रिदीने पुन्हा मिळवली फिटनेस, वाचा सविस्तर





