मुंबई । आयपीेल लिलावापाठोपाठ लवकरच प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी लिलाव होणार आहेत. त्यापुर्वी संघांना चार खेळाडू रिटेन करण्याची (कायम ठेवण्याची) मुभा होती.
त्यातील केवळ पाटणा पायरेट्स आणि पुणेरी पलटण संघांनी ४ खेळाडू संघात कायम केले. पुणेरी पलटणने संदीप नरवाल, राजेश मोंडल, जी. बी. मोरे, गिरीश ईर्नाक यांना तर पाटणा पायरेट्सने प्रदीप नरवाल, जयदीप, जवाहर डागर, मनीष कुमार या खेळाडूंना कायम केले.
यू मुंबा संघाने एकही खेळाडूला कायम केले नाही. त्यांनी कॅप्टन कूल अनुप कुमारबरोबर एकाही खेळाडूला ६व्या हंगामासाठी कायम ठेवले नाही.
यातील जे खेळाडू संघात कायम झाले आहेत त्यांनी गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली आहे. त्यात बेंगळूरु बुल्सने रोहित कुमार, दबंग दिल्लीने मेराज शेख, पाटणा पायरेट्सने प्रदीप नरवाल आणि तामिळ थलायव्हासने अजय ठाकूर सारख्या दिग्गज खेळाडूंना कायम केले आहे.
अन्य खेळाडूंबद्दच्या लिलावाबद्दल अजून कोणतेही वृत्त नाही. प्रो कबड्डीला १९ आॅक्टोबरला सुरूवात होणार आहे.
या स्टार खेळाडूंनाही नाही केले कायम-
अनूप कुमार, नितीन तोमर, रिशांक देवडीगा, सुरेंदर नाडा, मोहीत चिल्लर, मनजीत चिल्लर, दिपक हुडा, सुकेश हेगडे.
संघात कायम केलेले खेळाडू-
पाटणा पायरेट्स : प्रदीप नरवाल, जयदीप, जवाहर डागर, मनीष कुमार
पुणेरी पलटण : संदीप नरवाल, राजेश मोंडल, जी. बी. मोरे, गिरीश ईर्नाक
गुजरात फॉर्च्यूनजायंट्स : सचिन, सुनील कुमार, महेंद्र रजपूत
तामिळ थलायव्हास : अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलुगू टायटन्स : नीलेश साळुंखे, मोहसीन मॅघसॉडलो जाफारी
बंगाल वॉरियर्स : सुरजीत सिंग, मणिंदर सिंग
बेंगळूरु बुल्स : रोहित कुमार
दबंग दिल्ली : मेराज शेख
हरयाणा स्टीलर्स : कुलदीप सिंग