---Advertisement---

प्रो कबड्डी: शानदार शुक्रवारी मुंबई-पुण्याचे ‘दमदार’ विजय; पलटणचा तिसऱ्या क्रमांकावर कब्जा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 21, 2022 9:42 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात शुक्रवारी (21 ऑक्टोबर) तीन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यु मुंबाने अखेरच्या क्षणी बाजी पलटवत हरियाणा स्टीलर्सला 32-31 असे पराभूत केले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणने विजयी सातत्य कायम राहत बंगालला 27-25 असे पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.

महाराष्ट्र डर्बीनंतर प्रथमच मैदानात उतरत असलेल्या यु मुंबाने या सामन्यात संथ सुरुवात केली. आक्रमक सुरुवात करणारा हरियाणा स्टीलर्स पहिल्या हाफच्या अखेरीस आघाडीवर होता. मात्र, मुंबईने त्यानंतर अचानक वेग पकडला. गुमान सिंग याने रेडींगची जबाबदारी घेतली. सुरेंदर सिंगने कर्णधाराला साजेसा खेळ करत डिफेन्समध्ये 6 गुणांची कमाई केली. हरेंदर व जय भगवान यांनी त्याला सुरेख साथ दिली. अखेरच्या रेडआधी बरोबरीत असलेल्या या सामन्यात मुंबईने अखेरीस 32-31 असा विजय संपादन केला. हरियाणाचा सलग दुसऱ्या सामन्यात अखेरचा रेडमध्ये पराभव झाला.

दिवसातील दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणने बंगाल वारियर्सशी दोन हात केले. ‌‌‌‌ दोन्ही संघांनी बरोबरीची सुरुवात केल्यानंतर बंगालने सामन्यात आघाडी घेतली. मनिंदर व गिरीश एर्नाक यांनी अनुभव पणाला लावत बंगाल संघाला आघाडीवर ठेवले. पहिल्या हाफच्या शेवटी बंगाल संघ 15-11 असा आघाडीवर होता. त्यानंतर मात्र पुणे संघाने सामन्यावर अक्षरशः वर्चस्व गाजवले. संघाचा कर्णधार फझल अत्राचली व सोमबीर यांनी एका मागोमाग एक पकडी करत संघाची पिछाडी भरून काढत संघाला आघाडीवर नेले. या दोघांनीही हाय फाईव्ह नोंदवले. यासोबतच त्यांना आकाश शिंदे व अस्लम इनामदार यांनी रेडींग मध्ये तोलामोलाची साथ दिली. बंगालचा कर्णधार मनिंदर सिंगला सातत्याने बाहेर ठेवणे पुणे संघाच्या फायद्याचे ठरले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष
गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---