मुंबई | महाराष्ट्राला तब्बल 11 वर्षांना राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळवुन देण्यात कर्णधार म्हणुन मोलाची भुमिका पार पाडणाऱ्या कर्णधार रिशांक देवडिगाला युपी योद्धाज संघाने तब्बल 1 कोटी 11 लाख रुपये मोजत आपल्या संघात कायम केले.
यासाठी त्यांनी एफबीएम कार्ड वापरत संघात पुन्हा कायम केले. त्याला दबंग दिल्लीने लिलावात ही मोठी बोली लावली होती. त्याला संघात घेण्यासाठी मुंबई, दिल्ली, हरियाणा आणि पाटणामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस दिसली.
गेल्या हंगामात युपी संघाकडून खेळणाऱ्या रिशांकने शेवटच्या टप्प्यात एकाच सामन्यात रेडमध्ये सर्वाधिक गुण घेण्याचा पराक्रम केला होता. पुढे जात हा विक्रम आधी रोहित कुमारने तर त्यानंतर परदिप नरवालने मोडला होता.
यावर्षी महाराष्ट्राला हैद्राबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपदं मिळवुन देण्यात या खेळाडूने मोठी भुमिका पार पाडली होती.
मुंबई शहरात रहात असलेल्या 25 वर्षीय रिशांकचा मोठा चाहतावर्ग महाराष्ट्रात आहे. त्याला लागणाऱ्या बोलीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
रिशांकने या स्पर्धेत पहिले चार हंगाम मुंबईकडून खेळला आहे तर गेल्या हंगामात तो युपीकडूनच खेळला होता. त्याला ही मोठी रक्कम देताना लिलावापुर्वी त्याला का या संघाने कायम केले नाही याचे कारण मात्र समजले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रो-कबड्डीत सर्वात खळबळजनक बोली लागली मनजीत चिल्लरला
-अशी होती प्रो-कबड्डी लिलावात 1 कोटी रुपये मिळालेल्या फजल अत्राचलीची पहिली प्रतिक्रिया
–संपुर्ण यादी: प्रो-कबड्डी 2018मध्ये अशा लागल्या परदेशी खेळाडूंवर बोली
–आणि प्रो-कबड्डीला मिळाला पहिला 1 कोटीचा खेळाडू!
–या कारणामुळे यु-मुंबाने नाही केला एकही खेळाडू लिलावापुर्वी रिेटेन!
–तेव्हाच होईल महिलांची प्रो-कबड्डी पुन्हा सुरु!