आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी (ICC Champions Trophy 2025) भारतीय संघाची घोषणा आज (18 जानेवारी) करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी पत्रकार परिषदेत भारतीय संघाची घोषणा केली. तत्पूर्वी या बातमीद्वारै आपण चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, हे जाणून घेऊया.
यंदाच्या या मेगा स्पर्धेसाठी शुबमन गिलला (Shubman Gill) उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) उपकर्णधार शुबमन गिल डावाची सुरूवात करतील. विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या स्थानी खेळेल हे निश्चित झाले आहे. पत्रकार परिषदेत असेही सांगण्यात आले की, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मधल्या फळीत खेळेल.
रिषभ पंत (Rishabh Pant) आणि केएल राहुल (KL Rahul) दोघांचीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झाली आहे, परंतु कर्णधार रोहितने स्पष्ट केले की राहुल ही पहिली पसंती असेल. अशा परिस्थितीत, राहुल पाचव्या स्थानी खेळेल हे आधीच निश्चित झाले आहे. यानंतर, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सहाव्या क्रमांकावर खेळेल हे देखील निश्चित आहे.
पण यानंतरचे चित्र स्पष्ट नाही. पण ज्या प्रकारचा संघ निवडला गेला आहे ते पाहता, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की कर्णधार रोहित शर्माला खेळपट्टी पाहता आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी ठेवायची आहे आणि त्याला फिरकी गोलंदाजांसाठी अधिक पर्याय हवे आहेत. अशा परिस्थितीत, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सातव्या स्थानी आणि अक्षर पटेल (Axar Patel) किंवा वॉशिंग्टन सुंदरला (Washington Sundar) आठव्या स्थानी संधी मिळण्याची शक्यता आहे.
यानंतर, जर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गोलंदाजीत तंदुरुस्त असेल तर तो खेळेल, परंतु जर तो तंदुरुस्त नसेल, तर त्याच्या जागी अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) अंतिम अकरा खेळाडूंमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. पत्रकार परिषदेत याबद्दल स्पष्टपणे बोलले गेले आहे. त्याचबरोबर, मोहम्मद शमी (Mohammed Shami) खेळेल हे निश्चित आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग 11- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या-
जसप्रीत बुमराहचे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणे नाही निश्चित! रोहित शर्माचे मोठे वक्तव्य
Champions Trophy; ‘या’ 3 कारणांमुळे मोहम्मद सिराजला भारतीय संघातून वगळले
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आतापर्यंतचे विजेते, सर्वाधिक वेळा स्पर्धा कोणी जिंकली?