---Advertisement---

‘थाला’च्या पलटणला पहिल्या विजयाची आस; ‘अशी’ असेल चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जची प्लेइंग इलेव्हन?

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा आठवा सामना आज (१६ एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.

हंगामातील पहिल्याच लढतीत दिल्ली कॅपिटल्सच्या हातून चेन्नईचा ७ विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे या दारुण पराभवाचा वचपा काढत हंगामातील पहिला विजय साजरा करण्याचा त्यांचा हेतू असेल. दुसरीकडे विजयी सलामीसह हंगामाचा श्रीगणेशा झाल्याने पंजाबचा आत्मविश्वास दुणावला असेल. राजस्थान रॉयल्स संघाला त्यांनी ४ धावांनी चितपट केले होते. अशात या सामन्यातही विजयी लय कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

मागील सामन्याप्रमाणे ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस चेन्नईकडून डावाची सुरुवात करतील. सुरेश रैना, रविंद्र जडेजा, मोईन अली यांना मधल्या फळीत पाठवले जाईल. गोलंदाजीची जबाबदारी शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्रावो, दीपक चाहर आणि सॅम करन यांच्या खांद्यावर असेल. चेन्नईचा नवनियुक्त शिलेदार जेसन बेहरनडोर्फ आणि लुंगी एन्गिडी या सामन्यातही खेळताना दिसणार नाहीत. या खेळाडूंचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण होण्यास अजून थोडा वेळ बाकी असल्याने त्यांना संधी दिली जाणार नाही.

दुसरीकडे पंजाब संघ पहिल्या सामन्यातील तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरु शकतो. या सामन्यात कर्णधार केएल राहुलला आपल्या गोलंदाजांकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असेल.

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
ऋतुराज गायकवाड, फाफ डू प्‍लेसिस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायुडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), सॅम करन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर

पंजाब किंग्जची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, दीपक हुडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, झाय रिचर्डसन, रवि बिश्‍नोई, मोहम्‍मद शमी, अर्शदीप सिंह

महत्त्वाच्या बातम्या-

“तू आता जास्त आक्रमक नाही राहिला, त्यामुळे…” पंजाबविरुद्धच्या लढतीपुर्वी गंभीरने धोनीला दिले ज्ञान

व्हिडिओ: १२ लाखांच्या दंडाच्या भितीने पंतला फुटला घाम; पंचांना म्हणाला, “तो एक मिनिट तुम्हीच घेतला”

निर्णायक क्षणी कर्णधार पंतने अश्विनवर दाखवला नाही विश्वास, इथेच झाली चुक; प्रशिक्षकाची कबुली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---