इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा सतरावा सामना आज (शुक्रवार, २३ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. या सामन्यात उभय संघ विजयाची आस उरी बाळगून मैदानावर उतरतील.
यापुर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या लढतीत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने पराभव झाला होता. या सामन्यातील बारीकसारीक चुकांमध्ये सुधारणा करत विजय मिळवण्याचा त्यांचा हेतू असेल. दुसरीकडे मागील सलग तीन सामन्यात सूर न गवसलेल्या केएल राहुलच्या पंजाब संघालाही विजयाची आस असणार आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहितव्यतिरिक्त इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यांची मधळी फळी तर सपशेल फ्लॉप ठरली होती. अशात फलंदाजी करताना भक्कम धावसंख्या उभारण्याकडे त्यांचे लक्ष असेल. तसेच पंजाबचा कर्णधार राहुल, ख्रिस गेल, मयंक अगरवाल या धाकड फलंदाजांची लवकर विकेट काढण्यासाठी राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंल्ट बोल्टसह नाथन कूल्टर नाईल यालाही अंतिम ११ जणांमध्ये स्थान दिले जाईल.
पंजाबला निकोलस पूरन आणि ख्रिस गेलकडून मुंबईविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. याबरोबरच मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि आर एम अश्विन यांच्यावरही संघाला लवकर विकेट मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, राहुल चाहर, नाथन कुल्टर नाइल, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग इलेवन-
केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हुड्डा, मोइसेस हेनरिक्स, शाहरुख खान, फॅबियन एलन, एम अश्विन, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.
महत्त्वाच्या बातम्या-
लिलावात नाकारलं तरी मॅक्लेनघनचा इमान मुंबईपाशी, संघ अखेरच्या स्थानी राहिल्यास विकणार सर्व साहित्य
‘शिष्य आणि गुरुला एकत्र…’, रवी शास्त्रींनाही पडली पडीक्कल-कोहलीच्या कामगिरीची भुरळ, केलं कौतुक
किंग कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास ‘हा’ नवोदित शिलेदार उस्तुक, फोटो शेअर करत म्हणतो…






