---Advertisement---

किंग कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास ‘हा’ नवोदित शिलेदार उस्तुक, फोटो शेअर करत म्हणतो…

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 3:34 PM
---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली चषकामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूला रॉयल चेंलेंजर्स बेंगळुरू संघाने आयपीएल 2021 च्या लिलावामध्ये 20 लाख रुपये किंमतीत विकत घेतले आहे. आरसीबीने आपल्या ताफ्यात सामील केलेला हा खेळाडू संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत खेळण्यास खूप उत्सुक असून त्याने गुरूवारी (22 एप्रिल) रोजी आरसीबीच्या राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्या अगोदर एक ट्वीट केले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या ट्वीटमध्ये त्याने विराट कोहली आणि अनष्का शर्मा सोबत काढलेला आपला फोटो जोडला आहे. त्याखाली ‘नम्र आणि जमिनीशी जोडलेल्या लोकांमध्ये राहून मी खूप खूश आहे,’ असे लिहले आहे.

 

मोहम्मदने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली २०२०-२१ चषकामध्ये जलदगतीने शतक करण्याच्या यादीत दुसरे स्थान पटकावले होते. त्याच्या अगोदर हा पराक्रम रिषभ पंतने केला होता. पंतने 2018 साली अवघ्या 32 चेंडूत शतक ठोकले होते. तर मोहम्मदने 37 चेंडूत शतक केले होते, त्यानंतर 54 चेंडूत 137 धावा करून तो नाबाद राहिला होता. याच्या खेळीत त्याने 9 चौकार आणि 11 षटकार खेचले होते. तसेच या चषकामध्ये केरळ संघातून शतकी खेळी करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता.

त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीची सुरूवात 2015 साली केली होती, ज्यामध्ये त्याने 22 सामने खेळले असून यामध्ये 959 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 5 अर्धशतके आपल्या नावे केली आहेत.

आरसीबी संघाने त्याला आयपीएल 2021 च्या लिलावात आपल्या ताफ्यात सामील केले असले, तरी त्याने आत्तापर्यत आरसीबीकडून एकही सामना खेळलेला नाही. परंतु लवकरच त्याला संधी मिळण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तो एकतर ७०-८० धावा करतो नाहीतर काहीच नाही; शतक झळकावणाऱ्या ‘या’ फलंदाजावर गंभीरने ओढले ताशेरे

काय चेंडू टाकलास भावा! सिराजच्या ‘त्या’ लाजबाव यॉर्करने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

तुमचा का आमचा, शतकवीर पडीक्कल नक्की कोणाचा? खासदार अन् माजी क्रिकेटपटूमध्ये ‘ट्विटरवॉर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---