---Advertisement---

काय चेंडू टाकलास भावा! सिराजच्या ‘त्या’ लाजबाव यॉर्करने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 2:24 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून पदार्पण आंततराष्ट्रीय करणाऱ्या मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीमध्ये बरीचशी सुधारणा केल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तसेच गुरुवारी (२२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १० गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात सिराजने टाकलेल्या एका चेंडूची सोशल मीडियावर सर्वत्रच चर्चा रंगताना दिसून येत आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राजस्थान रॉयल्स संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या डेविड मिलरला दुसऱ्याच चेंडूवर सिराजने अप्रतिम यॉर्कर चेंडू टाकून पायचीत केले होते.

सिराजने लेग साईडच्या दिशेने वेगवान यॉर्कर चेंडू टाकला होता, जो त्याच्या बॅटला लागण्यापूर्वी त्याच्या शुजला लागला होता. सिराजने जोरदार मागणी केली होती. परंतु अंपयारने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर सिराजने विराटकडे डीआरएस घेण्याची मागणी केली होती. तसेच डीआरएस घेतल्यानंतर स्पष्ट दिसून येत होते की, चेंडू जाऊन यष्टीला लागत आहे. त्यामुळे अंपयारला आपला निर्णय बदलावा लागला होता. सिराजने टाकलेल्या या अप्रतिम चेंडूची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

https://twitter.com/ViratFanTrends/status/1385239368026058753?s=20

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिराजने कसोटी मालिकेत तब्बल १३ गडी बाद केले होते. तसेच या मालिकेत तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला होता. या दौऱ्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ षटक गोलंदाजी करत २७ धावा खर्च केल्या होत्या. यात त्याने ३ महत्वाचे गडी बाद केले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा पुढील सामना रविवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

तुमचा का आमचा, शतकवीर पडीक्कल नक्की कोणाचा? खासदार अन् माजी क्रिकेटपटूमध्ये ‘ट्विटरवॉर’

मी त्याच्या शॉटचा दिवाना झालोय; ‘सिक्सर मास्टर’ असलेल्या भारतीय खेळाडूची इंग्लिश दिग्गजाला भुरळ

‘बापू आला’; कोरोनावर मात करत अक्षर पटेलचे दिल्ली संघात जोरदार पुनरागमन, पाहा खास व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---