---Advertisement---

विराट कोहली-डेव्हिड वॉर्नरच्या संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन, पहा कुणाला मिळेल जागा

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२०चा तिसरा सामना सोमवार, २१ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. Probable Playing XI Of Royal Challengers Bangalore And Sunrisers Hydrabad

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील बेंगलोर संघाचे आयपीएलमधील प्रदर्शन नेहमीच शानदार राहिले आहे. तरीही त्यांचे पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे यावर्षी विराटचा बेंगलोर संघ हंगामाची सुरुवात विजयानेच करायची, या उद्देशाने मैदानावर उतरेल.

सोबतच धुरंदर फलंदाजांनी भरलेल्या या संघात ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचची भर पडली आहे. त्यामुळे संघाची फलंदाजी फळी अजून जास्त मजबूत झाली आहे. तसेच युवा सलामीवीर फलंदाज देवदत्त पड्डिकल याच्याकडूनही संघाला खूप अपेक्षा आहेत.

तर दूसऱ्या बाजूला ३ वेळा ऑरेंज कॅपचा (सर्वाधिक धावा) मानकरी ठरलेला डेव्हिड वॉर्नर याच्या हैद्राबाद संघाने २०१६ साली पहिल्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले होते. वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांना आयपीएलमधील सर्वात खतरनाक सलामी फलंदाजी जोडी म्हणून ओळखले जाते. गतवर्षी या सलामी जोडीने बेंगलोरविरुद्ध विक्रमी भागिदारी केली होती.

३१ मार्च २०१९ रोजी बेंगलोरविरुद्ध झालेल्या सामन्यात वॉर्नर-बेयरस्टोने सलामीला १८५ धावांची अफलातून भागिदारी करत त्यांनी हा पराक्रम केला होता. यावर्षीही ही जोडी अशीच कमाल करताना दिसू शकते. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे केन विलियम्सन, मनिष पांडे, मिशेल मार्श आणि फैबियन ऍलेन हे शानदार फलंदाजही उपलब्ध आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संभावित ११ जणांचा संघ – 

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, ऍरॉन फिंच, एबी डिविलियर्स, क्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी, शिवम दुबे, डेल स्टेन, नवदिप सैनी आणि युजवेंद्र चहल.

सनराइजर्स हैद्राबादचा संभवित ११ जणांचा संघ – 

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, विजय शंकर, विराट सिंग, मोहम्मद नबी, राशिद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि संदीप शर्मा.

महत्त्वाच्या बातम्या –

आज रंगणार रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनराइज हैद्राबाद सामना; जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही…

स्टॉयनिस ठरला दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा हिरो, पण ट्रोल होतोय विराटचा आरसीबी संघ, का ते घ्या जाणून

कोल्हापूरात रोहित- धोनी फॅन्सची कुस्ती रंगात

ट्रेंडिंग लेख –

मुंबई इंडियन्स संघात असूनही कधीच खेळण्याची संधी न मिळालेले ६ स्टार खेळाडू

१३ वा आयपीएल हंगाम गाजवणार हे ३ भारतीय गोलंदाज, मिळणार सर्वाधिक बळी?

आयपीएलच्या मागील ३ हंगामातील रोहित शर्माची कामगिरी, घ्या जाणून

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---