---Advertisement---

पड्डीकलचे पुनरागमन तर विलियम्सनची अनुपस्थिती, ‘अशी’ असेल RCB आणि SRH ची प्लेइंग इलेव्हन?

---Advertisement---

चेन्नई। इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा सहावा सामना आज (१४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. एमए चिंदबरम स्टेडियम, चेन्नई येथे संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. आपल्या पहिल्या सामन्या बलाढ्य मुंबई इंडियन्सला पराभूत करणारा बेंगलोर संघ हा सामना जिंकत विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. तर कोलकाता नाईट रायडर्सच्या हातून पराभूत झालेला हैदराबाद संघ या हंगामातील पहिला विजय नोंदवण्यासाठी झगडताना दिसेल. अशात हे दोन्ही संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरतील.

देवदत्त पड्डीकलचे पुनरागमन
बेंगलोर संघाच्या अंतिम ११ जणांच्या पथकात केवळ एक प्रमुख बदल होऊ शकतो. सलामीवीर देवदत्त पड्डीकल याचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. या युवा फलंदाजाला आयपीएल २०२१ ची सुरुवात होण्यापुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. परंतु आता कोरोनातून पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळे बेंगलोरकडून डावाची सुरुवात करताना दिसेल.

पड्डीकलच्या येण्याने युवा शिलेदार रजत पाटीदारला बाकावर बसावे लागू शकते. जर पड्डीकलला या सामन्यातही संधी देण्यात आली नाही तर कर्णधार विराट कोहलीसोबत वॉशिंग्टन सुंदर सलामीला फलंदाजीस उतरेल.

केन विलियम्सन या सामन्यातही बाकावर
हैदराबाद संघाविषयी बोलायचे झाले तर, त्यांचा धाकड फलंदाज केन विलियम्सन अजूनही खेळण्यासाठी सज्ज नाही. त्यामुळे पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही हैदराबाद संघ विलियम्सनविना मैदानात उतरेल. याखेरीज चेन्नईची खेळपट्टी पाहता मोहम्मद नबीला संघात कायम ठेवले जाऊ शकते. याबरोबर यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन वेगवान गोलंदाजाची कमान सांभाळताना दिसतील.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पड्डीकल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीविलियर्स, शाहबाज अहमद, डेन क्रिस्टियन, वॉशिंगटन सुंदर, कायल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल

समरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
डेविड वॉर्नर (कर्णधार), वृद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो, विजय शंकर,अब्दुल समद, मोहम्मद नबी, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि टी नटराजन

महत्त्वाच्या बातम्या-

गोलंदाजी करताना रोहितचा पाय मुरगळला अन् पत्नी रितीका काळजीने झाली अस्वस्थ, बघा तो क्षण

‘या’ खेळाडूची निवड करुन मुंबई इंडियन्सने मोठी चुक केली, माजी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य 

सर्वत्र ‘सूर्या’च्या ९९ मीटरच्या षटकाराची चर्चा, पण हा शॉट कुठे आणि कधी खेळायला सुरुवात केली? पाहा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---