मंगळवारी (13 एप्रिल) रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने दहा धावांनी विजय मिळवला. यंदाच्या आयपीएल मोसमातील मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय होता. या सामन्यादरम्यान कोलकाता संघ फलंदाजी करत असताना 14 व्या षटकात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा स्वत: गोलंदाजी करीता आला असताना जखमी झाला होता. यावेळी स्टेडियममध्ये सामना पाहात बसलेली त्याची पत्नी रितीका सजदेह काळजीने अस्वस्थ झाल्याचे दिसले.
आयपीएलमध्ये जवळजवळ 7 वर्षानंतर रोहित गोलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. परंतु पहिला चेंडू टाकण्याआधीच त्याचा पाय मुरगळल्याने तो जमिनीवर बसून वेदनांनी तडफडू लागला. रोहितला झालेली वेदना पाहून स्टेडियममध्ये हजर असलेली त्याची पत्नी रितिका सजदेहही अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.
रोहित शर्मा वेदना होत असल्याने खाली बसला, त्यावेळी टीव्ही कॅमेर्याचे लक्ष रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिच्याकडे होत. यात ती बरीच अस्वस्थ दिसली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
परंतु त्यानंतर रोहित शर्माने आपले षटक पूर्ण केले. त्याच्या षटकातील पहिला चेंडू शाकिबच्या बॅटची कडा लागून चौकारासाठी गेला. त्यानंतर पुढच्या पाच चेंडूंवर केकेआरच्या फलंदाजांनी पाच धावा केल्या. यापूर्वी रोहित शर्माने आयपीएल 2014 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गोलंदाजी केली होती. त्यामध्ये त्याने एका षटकात सहा धावा दिल्या होत्या.
https://twitter.com/lodulalit001/status/1382018447106736128?s=20
https://twitter.com/CricketUnlimi/status/1382024984730558465?s=20
या सामन्यात पाच वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध रोमांचक असा विजय नोंदविला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला मुंबई इंडियन्सचा संघ सुर्यकुमारच्या अर्धशतकाच्या जोरावर 152 धावा करु शकला. त्यानंतर दुसऱ्या डावात कोलकाता संघाने पहिल्या विकेटसाठी नितीश राणा (57 धावा)आणि शुभमन गिल (33 धावा) यांच्या 72 धावांच्या भागीदारीमुळे सहज विजय मिळविणार असे दिसत होते. परंतु मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या फलंदाजांचा मजबूत किल्ला ढासळत 10 धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ खेळाडूची निवड करुन मुंबई इंडियन्सने मोठी चुक केली, माजी दिग्गजाचे धक्कादायक वक्तव्य
सर्वत्र ‘सूर्या’च्या ९९ मीटरच्या षटकाराची चर्चा, पण हा शॉट कुठे आणि कधी खेळायला सुरुवात केली? पाहा
‘आज जे काही आहे, ते फक्त मुंबई इंडियन्समुळेच,’ केकेआरच्या क्रिकेटपटूचे मन जिंकणारे वक्तव्य