संपुर्ण नाव- अंबाती तिरुपती रायडू
जन्मतारिख- 23 सप्टेंबर, 1985
जन्मस्थळ- गुंटूर, आंध्र प्रदेश
मुख्य संघ- भारत, बडोदा, बडोदा क्रिकेट असोसिएशन एकादश, ब्रॅडमन एकादश, मध्य विभाग, चेन्नई सुपर किंग्स, हैद्राबाद, हैद्राबाद हिरोज, 16 वर्षांखालील हैद्राबाद संघ, आयसीएल भारत एकादश, भारत अ, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग टिम, इंडिया रेड, इंडिया ग्रीन, वरिष्ठ भारतीय संघ, 19 वर्षांखालील भारतीय संघ, मुंबई इंडियन्स, शेष भारतीय संघ, दक्षिण विभाग, 16 वर्षांखालील भारतीय संघ, विदर्भ आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 24 जुलै, 2013, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 7 सप्टेंबर, 2014, ठिकाण – बर्मिंगहम
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 55, धावा- 1694, शतके- 3
गोलंदाजी- सामने- 55, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 1/5
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 42, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-अंबाती रायडूने 2002मध्ये वयाच्या 16व्या वर्षी 19 वर्षांखालील इंग्लंड संघविरुद्ध दमदार खेळी केली होती. यावेळी त्याने संघाच्या एकूण 262 धावांपैकी नाबाद 177 धावा केल्या होत्या. भारताने तो सामना एका विकेटने जिंकला होता.
-2004सालच्या 19 वर्षांखालील भारतीय संघात अनेक भविष्यातील आंतरराष्ट्रीय संघातील खेळाडू होते. यात शिखर धवन, सुरेश रैना, इरफान पठान, दिनेश कार्तिक आणि आरपी सिंग यांचा त्यात समावेश होता. रायडू हा त्या संघाचा कर्णधार होता.
-रायडू हा अत्यंत रागीट स्वभावाचा व्यक्ती आहे. त्याचे हैद्राबाद संघाचे प्रशिक्षक राजेश यादव यांच्याशी वाद झाल्याने त्याला आंध्र प्रदेश संघात जावे लागले होते.
-2005मध्ये माजी क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन याच्यासोबतही मैदानावर त्याचे वाद झाला होता. यावेळी अर्जुनने रायडूला स्टंपने मारले होते. तसेच रायडूंने पंचासोबतही वाद घातला होता.
-आयपीएलच्या 9व्या हंगामात हरभजन सिंगने रायडूला बाईट शब्द वापरले होते. राइजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध खेळत असताना हरभजनच्या चेंडूवर सौरभ तिवारीने चौकार मारला होता. तेव्हा रायडूला तो चेंडू न अडवता आल्याने तो चौकार गेला. यावर हरभजनने त्याला वाईट शब्द वापरले होते.
-रायडूने वाढदिवसाच्या एका महिन्यापुर्वी सकाळी व्यवस्थित कार न चालवल्याने जेष्ठ नागरिंसोबतही वाद घातला होता. त्यावेळी हर्षा गोएंका यांनी त्याच्याविरुद्ध ट्विट केले होते.
-रायडी हा आयसीएलमधील मोठा खेळाडू आहे. त्याने हैद्राबाद हिरोज आणि आयसीएल भारत एकादशकडून क्रिकेट खेळले आहे. 2008मध्ये त्याला आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघात प्रवेश मिळाल्याने तो आयसीएलमधून बाहेर पडला.
-2011मध्ये आयपीएलच्या 70व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या 175 धावांचा पाठलाग करत असताना मुंबई इंडियन्स 5 बाद 135 धावांवर होते. यावेळी शेवटच्या 15 चेंडूत मुंबईला 38 धावांची गरज होती. तेव्हा जेम्स फ्रॅंकलीन आणि रायडू फलंदाजीस होते. कसेबसे त्यांनी 34 धावा केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर संघाला 4 धावांची आवश्यकता असताना रायडूने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता.
-पदार्पणाच्या वनडे सामन्यात रायडूने नाबाद 63 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. ही कामगिरी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 2013मध्ये केली होती. तसेच वनडेत पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा तो 12वा भारतीय क्रिकेटपटू ठरला.
-34 वनडे सामन्यात रायडूने 2 शतके आणि 6 अर्धशतकांसह 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
-रायडूने 2014ला हैद्राबादच्या एका हॉटेलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या पूर्ण संघासाठी बिर्याणी बनवली होती.