संपुर्ण नाव- कृष्णाकुमार दिनेश कार्तिक
जन्मतारिख- 1 जून, 1985
जन्मस्थळ- मद्रास (आताची चेन्नई), तमिळनाडू
मुख्य संघ- भारत, अबहानी लिमिटेड, अल्बर्ट टीयुटीआय पॅट्रिओट्स, दिल्ली डेअरडेविल्स, गुजरात लायन्स, आयसीसी विश्व एकादश, भारत अ, इंडिया ब्ल्यू, 19 वर्षांखालील भारतीय संघ, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दक्षिण विभाग आणि तमिळनाडू
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 3 ते 5 नोव्हेंबर, 2004
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लड, तारिख – 5 सप्टेंबर, 2004
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तारिख – 1 डिसेंबर, 2006
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 26, धावा- 1025, शतके- 1
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 94, धावा- 1752, शतके- 0
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 32, धावा- 399, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा चेन्नईतील तेलुगु नायडू (कपू) कुटुंबातील आहे. त्याचे वडील कृष्णकुमार यांनी लहानपणी क्रिकेट खेळले होते. मात्र, वडिलांच्या आग्रहाखातर त्यांना त्याचा त्याग करावा लागला.
-वडिल कृष्णकुमार यांच्या प्रयत्नामुळेच दिनेश क्रिकेट क्षेत्राकडे वळला. वडिलांनी त्याला लहानपणी लेदर बॉलचा सामना करायला शिकवले.
-दिनेशला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आणि वैयक्तिक जीवनातही अनेकदा चढ-उतारांना सामोरे जावे लागले.
-त्याने 2002ला बडेदाविरुद्ध आपले परथम श्रेणी पदार्पण केले. यावेळी 8व्या क्रमांकावर फलंदाजी करत दिनेशने केवळ 37 धावा केल्या होत्या.
-मात्र, पुढील सामन्यात त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध नाबाद 88 धावांची खेळी करत आणि 1 विकेट घेत तमिळनाडू संघाला पराभूत होण्यापासून वाचवले होते. तो सामना अनिर्णीत राहिला होता.
-2004साली दिनेशने इग्लंडविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. यावेळी अनिल कुंबळे यांच्या गोलंदाजीवर दिनेशने यष्टीमागे इंग्लंडच्या मायकल वेगॉनची विकेट घेतली होती.
-डिसेंबर 2006 सालच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 सामन्यात दिनेशने 28 चेंडूत 31 धावा करत सलामीवीर पुरस्कार मिळवला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20त सलामीवीर बनणारा तो पहिलाच भारतीय ठरला होता.
-दिनेशला भारतीय संघात त्याचे स्थान पक्के करता आले नाही. त्याला बराच काळ भारतीय संघातून आत बाहेर करावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून 2004साली कसोटीत पदार्पण करणाऱ्या दिनेशने 10 कसोटी सामन्यात अवघे 1 अर्धशतक ठोकले होते.
-2008मध्ये दिनेशने भारतीय अभिनेत्री निगार खानसह डान्स रिऍलिटी शो एक खिलाडी एक हसीनामध्ये भाग घेतला होता.
-2012-13 च्या रणजी मोसमात त्याने 8 सामन्यात 577 धावा करत पुन्हा एकदा त्याची दखल घ्यायला सर्वांना भाग पाडले.
-2012-13च्या देशांतर्गत हंगामातील कामगिरीने त्याला 2013च्या इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे वनडेत पुनरागमन करण्याची संधी मिळाली. यावेळी दिनेशने 5 सामन्यात 82 धावा केल्या. ज्यात त्याच्या नाबाद 51 धावांचा समावेश होता.
-2014ला आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्स संघाने त्याला 12.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तर, 2015साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 10.5 कोटींना विकत घेतले होते. यावेळी दोन्ही संघाकडून तो चमकदार कामगिरी करू शकला नाही.
-यासह दिनेश आयपीएलच्या 2014-15 हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा क्रिकेटपटू ठरला होता. तर, युवराज सिंग हा त्यावेळी सर्वात महागडा क्रिकेटपटू होता.
-पुढे 2016ला गुजरात लायन्सने त्याला 2.3 कोटींना आपल्या संघात स्थान दिले होते.
-मार्च 2018मध्ये त्याने तब्बल 8 वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन केले होते. यावेळी त्याने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बांगलादेश विरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याचा हा षटकार त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी महत्त्वाचा ठरला.
-विशेष म्हणजे रोहितने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात दिनेशच्या बॅटने फलंदाजी केली होती. रोहितने पहिले अर्धशतकही दिनेशने दिलेल्या बॅटने केले होते.
-एवढेच नाही तर, 2012ला 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताचा कर्णधार असणाऱ्या उन्मुक्त चंदनेही दिनेशचीच बॅट वापरुन अंतिम सामन्यात शतक ठोकले होते आणि भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.