संपुर्ण नाव- करूण कलारधरन नायर
जन्मतारिख- 6 डिसेंबर, 1991
जन्मस्थळ- जोधपूर, राजस्थान
मुख्य संघ- भारत, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, 19 वर्षांखालील भारतीय संघ, कर्नाटक, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन कॉल्ट्स एकादश, कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन एकादश, 15 वर्षांखालील कर्नाटक संघ, 19 वर्षांखालील कर्नाटक संघ, किंग्स इलेव्हन पंजाब, मँगलोर युनायटेड, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दक्षिण विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध इंग्लंड, तारिख – 26 ते 29 नोव्हेंबर, 2016, ठिकाण – मोहाली
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 11 जून, 2016, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 6, धावा- 374, शतके- 1
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 2, धावा- 46, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-करूण नायरचा जन्म जरी राजस्थानमधील जोधपूर येथे झाला असला, तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचे वडील हे मेकॅनिकल इंजिनिअर होते. तर आई ही शिक्षिका होती.
-2013-14 या रणजी ट्रॉफी हंगामात कर्नाटककडून त्याने 6 सामने खेळत 500 धावा केल्या. यात त्याच्या 3 शतकांचा समावेश होता.
-2012 साली आयपीएलच्या 5व्या हंगामात रॉयल चॅंलेजर्स बेंगलोरने नायरला संधी दिली होती. तो या हंगामात मात्र 2 सामने खेळू शकला.
-2013-14 या रणजी ट्रॉफी हंगामात नायरने सलग 3 सामन्यात 3 शतके ठोकली होती. उपांत्यपुर्व फेरित, उपांत्य फेरित आणि अंतिम सामन्यात त्याने शतक ठोकले होते. तसेच अंतिम सामन्यातील त्याच्या षटकाराने कर्नाटकला 10 वर्षांनंतर रणजी ट्रॉफी जिंकून दिली होती.
-विशेष म्हणजे कर्नाटकचा सलामीवीर फलंदाज नायरला त्याच्या वयोगटातील 4 वर्षात एकही शतक ठोकता आले नाही.
-2016मध्ये नायर आरसीबीतून दिल्ली डेअरडेविल्समध्ये सामाविष्ट झाला.
-नायर हा खाण्याचा खूप शौकिन आहे. त्याने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, तो एका महिन्यापेक्षा जास्त त्याच्या फूड डायटला पूर्ण करू शकत नाही.
-नायर त्याच्या यशामागील श्रेय राहूल द्रविड देतो. त्याच्या सहकार्याने आणि त्याच्या सहवासाने माझ्यात अनेक बदल घडवून आणले, असे नायरचे म्हणणे आहे.
-2014-15मध्ये कर्नाटककडून रणजी ट्रॉफी सामन्यात नायरने 560 चेंडूत त्रिशतक (328) केले होते. यावेळी त्याने तिसऱ्या दिवसापासून ते चौथ्या दिवशी सकाळीपर्यंत फलंदाजी केली होती. शेवटी कर्नाटकने 762 धावा केल्या आणि तमिळनाडूला एका डावाच्या आघाडीने 217 धावांनी पराभूत केले.
-तमिळनाडू विरु्धच्या नायरच्या 328 धावांनी 68 वर्षे जुना गुल मोहम्मद यांचा 319 धावाचा विक्रम मोडला होता. हा विक्रम त्यांनी 1946-47मध्ये बडोदा विरुद्ध होळकर दरम्यान झालेल्या रणजी ट्रॉफी सामन्यात केला होता.
-आयपीएल 2014मध्ये न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी आणि नायरने मिळून उत्कृष्ठ झेल पकडला होता. तो त्या हंगामातील सर्वोत्कृष्ठ झेल (कॅच ऑफ द टूर्नामेंट) ठरला.
-जुलै 2016मध्ये नायर एका दुर्घटनेत सापडला होता. केरळमधील पंपा नदीत 100 लोकांनी भरलेल्या स्नेक बोटमध्ये प्रवास करत असताना, काही कारणाने सर्वांना बोटमधून उतरून पोहत किनाऱ्यावर जावे लागले होते. यावेळी पोहायला न येणाऱ्या नायरला तेथील लोकांनी मदत करत त्याच्या जीव बचावला होता.
-2016म्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामन्यात फलंदाजीस गेलेल्या नायरने त्रिशतक करत विक्रम रचला होता. यासह तो विरेंद्र सेहवागनंतर कसोटीत त्रिशतक ठोकणारा दुसरा भारतीय ठरला.
-2018मध्ये तो आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघात होता. त्याने आयपीएलमध्ये एकूण 69 सामने खेळत 1464 धावा केल्या आहेत.