संपुर्ण नाव- सय्यद मुजतबा हुसेन किरमानी
जन्मतारिख- 29 डिसेंबर, 1949
जन्मस्थळ- मद्रास (आताची- चेन्नई)
मुख्य संघ- भारत, कर्नाटक, म्हैसूर आणि रेल्वे
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा गोलंदाज
क्षेत्ररक्षणाची जागा – यष्टीरक्षण
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 24 ते 28 जानेवारी, 1976
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 21 फेब्रुवारी, 1976
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 88, धावा- 2759, शतके- 2
गोलंदाजी- सामने- 88, विकेट्स- 1, सर्वोत्तम कामगिरी- 1/9
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 49, धावा- 373, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-सय्यद किरमानी यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील 10 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले होते.
-1979-80ला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत किरमानीने 17 झेल घेतले होते आणि 2 त्रिफळाचीत केले होते.
-क्राइस्टचर्च येथील भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यात किरमानी यांनी यष्टीरक्षण करताना यष्टीमागे 6 विकेट्स घेतल्या होत्या. यात 5 झेल आणि 1 त्रिफळाचीतचा समावेश होता. त्यावेळी ते एका कसोटी डावात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय होते. नंतर काही वर्षांनी एमएस धोनी, रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांनी यष्टीरक्षण करताना एका कसोटी डावात 6 विकेट्स घेण्याच्या त्यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.
-त्यांनी फलंदाजी क्षेत्रातही चांगली कामगिरी केली होती. 275 प्रथम श्रेणी सामने खेळत त्यांनी 30.15च्या सरासरीने 9620 धावा केल्या होत्या. यात 13 शतके आणि 38 अर्धशकांचा समावेश होता.
-1983च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजच्या विरुद्धच्या अंतिम सामन्यातील त्यांच्या कामगिरीमुळे किरमानी यांना सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकाचा पुरस्कार देण्यात आला होता.
-किरमानी यांच्या नावावर कसोटीतील भारताचा सर्वात यशस्वी यष्टीरक्षकाचा विक्रम नोंदलेला गेला होता. त्यांनी यष्टीरक्षण करताना 198 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, नंतर धोनीने कसोटीत 256 विकेट्स घेत त्यांचा हा विक्रम मोडला.
-मजेशीर गोष्ट अशी आहे की किरमानी हे खूप झोपाळू स्वभावाचे आहेत. आयडल्स या पुस्तकामध्ये सुनिल गावसकर यांनी लिहिले आहे की, किरमानी यांना फलंदाजी किंवा यष्टीरक्षणाचे काम नसेल तर ते क्रिकेट चालू असतानाही झोपी जायचे.
-एकदा तर, 1971मध्ये संघ व्यवस्थापक राम प्रकाश मेहरा यांनी किरमानी यांना झोपोतून उठवले होते आणि सामना पाहायला सांगितले होते. ते गेल्यानंतर किरमानी मात्र परत झोपी गेले.
-2015साली त्यांना बीसीसीआयने सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार दिला होता.
-निवृत्तीनंतर किरमानी यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये पीआर मॅनेजरचे काम केले आहे.
-सय्यद अबिद अली यांच्याशी किरमानी यांचे कौटुंबिक नातेसंबंध आहेत. अबिद यांचा मुलगा हा किरमानी यांचा जावई आहे. मुलगी फातिमासोबत अबिद यांचा मुलगा फकिर याचे 2002मध्ये लग्न झाले. मात्र, 2008मध्ये अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळताना फकिरचे ह्रद्य झटक्याने निधन झाले.
-सय्यद किरमानी भारताचे संदीप पाटील यांच्यासह कभी अजनबी या चित्रपटात काम केले आहे. तसेच, अनेक कन्नड चित्रपटातही त्यांनी काम केले आहे.