संपुर्ण नाव- सुदीप त्यागी
जन्मतारिख- 17 सप्टेंबर, 1987
जन्मस्थळ- गाझियाबाद, उत्तर प्रदेश
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, भारत अ, सनराइजर्स हैद्राबाद आणि उत्तर प्रदेश
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 27 डिसेंबर, 2009, ठिकाण – दिल्ली
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 12 डिसेंबर, 2009, ठिकाण – मोहाली
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 4, धावा- 1, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 4, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 1/15
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 1, धावा- 0, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 1, विकेट्स- 0, सर्वोत्तम कामगिरी- 0/00
थोडक्यात माहिती-
-सुदीप त्यागी याने शलभ श्रीवास्तवच्या जागी 2007मध्ये उत्तर प्रदेश संघाकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ओडिसाच्या फलंदाजांच्या एका डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
-तसेच पुढील आंध्र प्रदेशविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 9 विकेट्स घेतल्या होत्या. अशाप्रकारे आपल्या पदार्पणाच्या हंगामात त्यागीने एकूण 41 विकेट्स घेतल्या होत्या.
-2008च्या आयपीएल हंगामात त्यागी चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता.
-पाठीच्या मनक्यात फ्रॅक्चर झाल्याने त्यागीला पहिला हंगाम आयपीएलमध्ये खेळता आले नाही. तसेच 2008-09चा देशांतर्गत हंगामही तो खेळू शकला नाही.
-श्रीलंकाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यातून त्यागीने वनडेत पदार्पण केले होते. 2009मधील वनडे सामन्यात त्याने कुमार संगकाराची पहिली विकेट घेतली होती. मात्र, खेळपट्टी व्यवस्थित नसल्याने पंचाच्या मारणीनुसार तो सामना रद्द करण्यात आला.
-त्यागीने त्याचा शेवटचा वनडे सामना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध फेब्रुवारी 2010मध्ये खेळला. यावेळी त्याने 8 षटकात 59 धावा केल्या होत्या. तसेच भारताने तो सामना 90 धावांनी जिंकला होता.
-2014-15मध्ये त्यागीने सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तो सौराष्ट्रकडून क्रिकेट खेळतो.