---Advertisement---

पीएसएल विजेत्या संघाच्या मोहम्मद हाफिजला बक्षीस म्हणून मिळाला आयफोन; संघसहकाऱ्याने थेट घेतली हाताची किस

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 9:07 PM
Mohammad-Hafeez
---Advertisement---

रविवारी (२७ फेब्रुवारी) पाकिस्तान सुपर लीगचा (Pakistan Super League) अंतिम सामना पार पडला. हा सामना मुलतान सुलतान विरुद्ध लाहोर कलंदर्स संघात पार पडला. या सामन्यात लाहोर संघाने मुलतान सुलतान संघाला ४२ धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला. लाहोर संघाच्या विजयात मोहम्मद हाफिजने (Mohammad Hafeez) मोठे योगदान दिले. त्याने आधी फलंदाज आणि त्यानंतर गोलंदाजीतही आपला जलवा दाखवला.

मोहम्मद हाफिजचे अष्टपैलू प्रदर्शन
मोहम्मद हाफिजने ४६ चेंडूत १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६९ धावांची खेळी केली. ही खेळी लाहोर संघासाठी सर्वात मोठी होती. यानंतर हाफिजने ४ षटकात केवळ २३ धावा देत २ बळी घेतले.

मोहम्मद हाफिजला भेट म्हणून मिळाला आयफोन, संघसहकाऱ्याने घेतली हाताची किस
अंतिम सामन्यात सामनावीर मोहम्मद हाफिजला ड्रेसिंग रूममध्ये बक्षीस म्हणून आयफोन देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर हाफिजने सांगितले की, शेवटी त्याला हे गिफ्ट मिळालेच. हाफिजच्या या आनंदात फखर जमानही (Fakhar Zaman) सहभागी झाला होता. फखर त्याच्या जवळ गेला आणि मिठी मारल्यानंतर हाताची किस घेतली. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

लाहोर संघाने प्रथम फलंदाजी करताना बनवल्या होत्या १८० धावा
गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात लाहोरने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून १८० धावा केल्या होत्या. ७९ धावांपर्यंत संघाचे ४ गडी तंबूत परतले होते. त्यानंतर मोहम्मद हाफिज आणि हॅरी ब्रूक्स यांनी संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

हाफिजने ६९, तर ब्रूक्सने २२ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. विरोधी संघाकडून आसिफ आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या.

मुलतान सुलतानची गाडी १३८ वरच रुळावरून खाली
लाहोर संघाने दिलेल्या १८१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुलतान सुलतान संघाचा डाव १९.३ षटकात अवघ्या १३८ धावांवरच संपुष्टात आला. या संघाकडून खुशदिल शाहने सर्वाधिक ३२ धावा केल्या. दुसरीकडे टीम डेव्हिडने २७ धावांचे योगदान दिले. विजयी संघाकडून कर्णधार शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त हाफिज आणि जमानने प्रत्येक २ विकेट्स, तर हॅरिस रऊफ आणि डेविड वीसने प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---