---Advertisement---

एक-दोन नाही, सहा ठोकलेत! इफ्तिखारने वहाब रियाजच्या एकाच ओव्हरमध्ये भिरकावले 6 षटकार, व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, फेब्रुवारी 5, 2023 7:26 PM
Iftikhar-Ahmed
---Advertisement---

पाकिस्तान सुपर लीग 2023 स्पर्धेला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी रविवारी (दि. 5 फेब्रुवारी) एक प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. पेशावर जालमी विरुद्ध क्वेटा ग्लेडिएटर्स असा सामना रंगला होता. या सामन्यात क्वेटा संघाकडून खेळताना इफ्तिखार अहमद याने वादळी फलंदाजी केली. त्याने यादरम्यान एकाच षटकात 6 षटकार ठोकत खास विक्रम आपल्या नावावर केला.

पेशावर जालमी विरुद्ध क्वेटा ग्लेडिएटर्स (Peshawar Zalmi vs Quetta Gladiators) संघातील सामन्यात झालेल्या नाणेफेकीचा कौल बाबर आझम याच्या नेतृत्वातील पेशावर संघाच्या पारड्यात पडला. यावेळी बाबरने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या क्वेटा संघाने निर्धारित 20 षटकात एकूण 184 धावा कुटल्या. या 184 धावांमधील 36 धावा या वहाब रियाज (Wahab Riaz) टाकत असलेल्या 20व्या षटकातून आल्या. या धावा इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) याने चोपल्या. त्याने मैदानाच्या चारही बाजूला फटके मारत 50 चेंडूत 90 धावांची वादळी खेळी साकारली.

वहाबच्या षटकात मारले 6 षटकार
अहमद याने त्याचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 42 चेंडूंचा सामना केला होता. त्यानंतर त्याने वहाबची चांगलीच धुलाई करत स्ट्राईक रेटही वाढवला. त्याच्या 6 षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वहाबच्या पहिल्याच चेंडूवर अहमदने स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार मारला. त्यानंतर दुसरा षटकार सरळ दिशेने मारला. तिसऱ्या षटकार गोलंदाजाच्या डोक्यावरून मारला. चौथ्या चेंडूवर कव्हर बाऊंड्रीवरून षटकार मारला. पाचव्या चेंडूवर थर्ड मॅनच्या दिशेने आणि शेवटच्या चेंडूवर थर्ड मॅन बाऊंड्रीवरून षटकार मारला. अशाप्रकारे तो एका षटकात 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला.

https://twitter.com/taimoorze/status/1622156994714144769?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1622156994714144769%7Ctwgr%5E2e0d0962c88c109827ddb265cb513f1a9a1c7f06%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fwatch-video-iftikhar-ahmed-hits-6-sixes-in-an-over-of-wahab-riaz-in-exhibition-match-hindi-3754726

एका षटकात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
गॅरी सोबर्स (प्रथम श्रेणी क्रिकेट)
रवी शास्त्री (प्रथम श्रेणी क्रिकेट)
हर्शल गिब्स (वनडे)
युवराज सिंग (टी20)
जॉर्डन क्लार्क (दुसरा इलेव्हन सामना)
कायरन पोलार्ड (टी20)
मिसबाह-उल-हक (हाँगकाँग T20 ब्लिट्झ)
हजरतुल्ला जझाई (टी20)
थिसारा परेरा (अ दर्जाचे क्रिकेट)
रवींद्र जडेजा (आंतर जिल्हा टी20 स्पर्धा)
जसकरण मल्होत्रा ​​(वनडे)
लिओ कार्टर (टी20)
ऍलेक्स हेल्स (नॅटवेस्ट टी20 ब्लास्ट)
इफ्तिखार अहमद (प्रदर्शनीय सामना)

बीपीएल 2023 मध्येही दाखवला दम
इफ्तिखार अहमद याने प्रदर्शनीय सामन्यापूर्वी बांगलादेश प्रीमिअर लीग स्पर्धेत फॉर्च्युन बरीशाल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने संघासाठी 10 सामने खेळले. त्यात त्याने 347 धावा चोपल्या. त्याने या स्पर्धेत 1 शतक आणि 3 अर्धशतकेही मारली. अहमदने स्पर्धेत 161.39च्या शानदार स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. (psl 2023 batter iftikhar ahmed smashed 6 sixes in a single over in psl exhibition match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाची ताकद संपली? पहिल्या कसोटीपूर्वीच वेगवान गोलंदाजीचा कणा समजला जाणारा धुरंधर बाहेर, वाचाच
जेव्हा पाकिस्तानचे राष्ट्रपतीही झालेले ‘माही’च्या हेअरस्टाईलचे फॅन, सर्वांसमोर केली होती ‘ही’ खास विनंती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---