---Advertisement---

‘या’ पंजाबी अभिनेत्रीवर आख्खं पाकिस्तान फिदा, पीएसएलमधील सामन्यादरम्यान चाहत्याची पोस्टरसोबत एन्ट्री

On: शुक्रवार, मार्च 3, 2023 8:12 PM
Sonam-Bajwa
---Advertisement---

क्रिकेट आणि सिने कलाकार यांचे फार जुने नाते आहे. हे आपल्या सर्वांनाच माहितीये. अनेकदा कलाकार क्रिकेट सामने पाहण्यासाठी मैदानात हजेरी लावत असतात. मात्र, पाकिस्तानमधील एका सामन्यात भारतीय अभिनेत्रीचे पोस्टर झळकले, असे सांगितल्यावर कदाचित क्रिकेटप्रेमींचा विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. पंजाबमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री असे आहेत, जे बॉलिवूडसोबतच पाकिस्तानमध्येही प्रसिद्ध आहेत. सोनम बाजवा हीदेखील त्यापैकीच एक आहे. कधीकाळी एअरहोस्टेस राहिलेल्या सोनमने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. सोशल मीडियावर आपल्या फोटोंनी आग लावणाऱ्या सोनमचा पाकिस्तानमध्येही जबरदस्त चाहतावर्ग आहे. असाच एक नजारा पाकिस्तान सुपर लीगमध्ये पाहायला मिळाला.

पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) स्पर्धेमधील 17वा सामना पेशावर जालमी विरुद्ध कराची किंग्स (Peshawar Zalmi vs Karachi Kings) संघात पार पडला. या सामन्यादरम्यान एक चाहता अभिनेत्री सोनम बाजवा (Actress Sonam Bajwa) हिचे पोस्टर घेऊन मैदानात पोहोचला होता. यावेळी तो सोनमवरील प्रेम व्यक्त करताना दिसला. पोस्टरमध्ये लिहिले होते की, “मी सोनम बाजवा हिच्या सर्वोच्चतेमध्ये विश्वास करतो.” सोनमच्या तीन फोटोंच्या बॅनरसोबत आता तिच्या चाहत्याचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

https://twitter.com/taimoorze/status/1631192470175244292

अभिनेत्रीनेही शेअर केला फोटो
विशेष म्हणजे, अभिनेत्री सोनम बाजवा (Sonam Bajwa) हिनेदेखील हा फोटो रिट्वीट केला. तिने रिट्वीट करत लिहिले की, “हे खूप छान आहे.”

नैनीतालमध्ये 16 ऑगस्ट, 1989 रोजी जन्मलेल्या सोनमचे पूर्ण नाव सोनमप्रीत बाजवा आहे. दिल्ली विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर सोनम एअरहोस्टेस बनण्यासाठी मुंबईत आली होती. सन 2012मध्ये तिने फेमिना मिस इंडियामध्येही हात आजमावला. तसेच, मॉडेलिंगही सुरू केले. तिला पहिला ब्रेक ‘बेस्ट ऑफ लक’ या पंजाबी सिनेमातून 2013 साली मिळाला. त्यानंतर तिला आयुष्मान खुरानासोबत ‘बाला’ (2019) सिनेमात संधी मिळाली होती.

सामन्याचा आढावा
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पेशावर जालमी संघाने हा सामना 24 धावांनी खिशात घातला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पेशावर संघाने 5 विकेट्स गमावत 197 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान पार करताना कराची किंग्स संघाला अपयश आले. त्यांनी यावेळी 20 षटकात 8 विकेट्स गमावत फक्त 173 धावाच केल्या. त्यामुळे हा सामना त्यांना 24 धावांनी गमवावा लागला. (psl indian actor and model sonam bajwa poster goes viral in pakistan super league)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आदिल रशीदचा नाद पराक्रम! बांगलादेशविरुद्ध 4 विकेट्स घेताच ब्रॉडच्या विक्रमही काढला मोडीत, रेकॉर्ड पाहाच
‘ही भारतीय गोलंदाजांची मेहनत नाही, तर मजुरीये…’, रोहितच्या वक्तव्यावर दिग्गजाचा पलटवार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---