भारतीय संघाचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा स्ट्राईक रेटवरुन होणाऱ्या चर्चांवर भाष्य केले आहे. माध्यमांमध्ये माझ्या स्ट्राईक रेटवर कितीही चर्चा झाली तरी मला प्रशिक्षक व कर्णधाराचा पुर्ण पाठींबा आहे असे पुजाराने म्हटले आहे.
गेल्याच आठवड्यात सौराष्ट्राकडून खेळताना पुजाराने २३७ चेंडूत ६६ धावांची खेळी केली होती. यामुळे त्याचा राष्ट्रीय तसेच सौराष्ट्र संघातील स्ट्राईक रेटवर चर्चा सुरु झाली होती. त्यावर पुजाराने ‘नविन खेळाडूंना माझा खेळ आवडत नसल्याचे भाष्य केले होते.’
परंतु आता पुजाराने त्याही पुढे संघव्यवस्थापनाचा मला पुर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. “मला वाटतं नाही यावर एवढी चर्चा का होतेय. माध्यमे वेगळं काहीतरी दाखवत आहे. परंतु संघव्यवस्थापनाचा माझ्यावर पुर्ण विश्वास आहे. माझ्यावर प्रशिक्षक, कर्णधार किंवा अन्य कुणाचा कोणताही दबाव नाही.” असे पुजारा यावेळी म्हणाला.
“जेव्हा स्ट्राईक रेटची गोष्ट येते तेव्हा लोक संघव्यवस्थापनाकडे बोटं दाखवतात. परंतु संघव्यवस्थापनाला माझी खेळण्याची शैली व महत्त्व पक्के ठाऊक आहे. मला सोशल माध्यमांवर स्ट्राईक रेटवरुन प्रश्न केले जातात. परंतु त्याला उत्तर देण्यापेक्षा मी माझ्या संघाला विजयी करण्यासाठी मेहनत घेत असतो.” असेही पुजाराने एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.
ट्रेंडिग घडामोडी-
– आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
– सचिनचा पदार्पणाचा सामना भारतीयांना पहायला काय ऐकायलाही नाही…
– विराटने तेव्हा केलेला राडा ऑस्ट्रेलिया आजही विसरली नाही
– संंपुर्ण यादी: असा येतो बीसीसीआयच्या तिजोरीत पैसा
-अखेर मराठी माणसाच्या मदतीला धावुन आला मराठी माणूसच