भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेहनत घेत असून सध्या रणजी ट्रॉफी (2023-24) खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेत तिसरी फेरी खेळली जात असून रविवारी पुजाराने सौराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले आणि यादरम्यान एक विशेष कामगिरीही केली. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 20,000 धावा पूर्ण केल्या आणि अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
सौराष्ट्रने विदर्भावर 238 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पुजाराने पहिल्या डावात 43 धावांचे योगदान दिले, तर दुसऱ्या डावात 66 धावा केल्या. त्याच्या अर्धशतकाच्या बळावर सौराष्ट्राने दुसऱ्या डावात 244 धावा केल्या आणि पहिल्या डावातील आघाडी जोडून विदर्भाला 300 हून अधिक धावांचे लक्ष्य दिले, ज्याचा पाठलाग करताना विदर्भ संघ 134 धावाच करू शकला.
35 वर्षीय खेळाडूने 66 धावांच्या खेळीत 20,000 प्रथम श्रेणी धावांचा टप्पा ओलांडला. त्याने 260 सामन्यांमध्ये 51.98 च्या सरासरीने ही कामगिरी केली आहे. पुजाराच्या पुढे भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड (55.33 च्या सरासरीने 23794 धावा), मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (57.84 च्या सरासरीने 25396 धावा) आणि लिटल मास्टर सुनील गावस्कर (51.46 च्या सरासरीने 25834 धावा) आहेत. आता पुजाराही या दिग्गजांमध्ये सामील झाला आहे.
चेतेश्वर पुजारा अनेक वर्षांपासून भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग होता आणि त्याने अनेक संस्मरणीय विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताच्या पहिल्या कसोटी मालिकेत पुजाराचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्याने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले आणि 43.60 च्या सरासरीने 7195 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून 19 शतके आणि 35 अर्धशतके झाली. (Pujara’s great record joins the list of great players like Gavaskar-Tendulkar)
हेही वाचा
पीसीबीने एनओसी नाकारल्यामुळे मोहम्मद हॅरिसला सोडावे लागले बीपीएल
केएस भरतने शतक केले भगवान रामाला समर्पित, शतकाच्या खास सलिब्रेशनचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल