पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनंतर आता शिखर धवन पुढे सरसवला आहे. या मदतीबद्दल धवनने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन याबद्दल माहीती दिली आहे. त्याने या व्हिडिओमध्ये देशवासीयांनाही जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी अवाहन केले आहे.
याआधी सेहवागने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
धवनने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ‘आपले 40 जवान शहीद झाल्याने देशाला मोठे दु:ख झाले आहे. जवानांच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. या नुकसानाची भरपाई होऊ शकत नाही. पण मी शहीद जवानांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जेवढे मला जमेल तेवढे मी त्यांच्यासाठी करेल.’
तसेच धवन पुढे म्हणाला, ‘मी तूम्हा सर्वांनाही विनंती करतो की जेवढे शक्य असेल तेवढे शहीद जवानांच्या कुटुंबांना पाठिंबा द्या. हीच वेळ आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी आणि आपल्या जवानांच्या कुटुंबांना पाठिंबा देण्यासाठी. परमेश्वर शहीद जवानांंच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला पुढे जाण्यासाठी शक्ती देवो. जय हिंद.’
This is the least we can do. Jis se jitna ban pade utna zaroor karein. Jai Hind🙏#standwithforces #pulwama pic.twitter.com/HvzzXi8ERb
— Shikhar Dhawan (@SDhawan25) February 17, 2019
सेहवाग, धवन प्रमाणेच भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगनेही पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबासाठी मदत जाहिर केली आहे.
तसेच विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार फेज फैजलने इराणी कप स्पर्धेचे विजेतेपद मिऴवल्यानंतर संपूर्ण बक्षीस रक्कम शहीद जवानांसाठी समर्पित केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियात स्थान न मिळालेला रहाणे करणार या संघाचे नेतृत्व
–२००० सालापुर्वी पदार्पण केलेले हे ५ खेळाडू विश्वचषकानंतर घेऊ शकतात निवृत्त
–२०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या ख्रिस गेलबद्दल कधी न ऐकलेल्या १० गोष्टी