पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष गटात दुसऱ्या फेरीत वैभव दहिभाते, उपेंद्र मुळ्ये, सुयोग पाटील, रजत कदम या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी क्लबच्या हॉलमध्ये आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पुरुष गटात तिसऱ्या मानांकित वैभव दहिभातेने पवन कदमचा 09-11, 11-7, 11-8, 11-8 असा तर, उपेंद्र मुळ्ये याने सुदीप अभ्यंकरचा 11-4, 11-9, 11-5 असा सहज पराभव करून आगेकूच केली. सुयोग पाटील याने अमोल चाफेकरवर 11-3, 11-1, 11-7 असा विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत प्रसाद बुरांडेने चिन्मय गायकवाडचा 12-10, 11-9, 6-11, 4-11, 13-11असा संघर्षपूर्ण पराभव करून तिसरी फेरी गाठली.
प्रौढ 40 वर्षावारील पुरुष गटात दुसऱ्या मानांकित संतोष वक्राडकरने समीर भालेचा 11-4, 11-00, 11-6 असा तर, तिसऱ्या मानांकित दिपेश अभ्यंकरने अनिल निंबाळकरचा 11-4, 11-4, 11-7 असा सहज पराभव करून विजयी सुरुवात केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन विद्या मुळ्ये, अखिलेश मुळ्ये, सोहम आपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबल टेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे, बिपीन चोभे, पीडिटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, पीडिटीटीएचे सिडिंग कमिटी सदस्य व व्यवस्थापन समिती सदस्य श्रीकांत अंतुरकर, राहुल पाठक, दिपेश अभ्यंकर, अविनाश जोशी, कपिल खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट : दुसरी फेरी:
प्रसाद बुरांडे वि.वि.चिन्मय गायकवाड 12-10, 11-9, 6-11, 4-11, 13-11;
आरुष गल्लापल्ली[4] वि.वि.वीरेन नार्वेकर 11-5, 11-6, 11-6;
शौर्य काळे वि.वि.अनिकेत बोकील 6-11, 11-13, 11-5, 11-9, 11-9;
कृपाल देशपांडे वि.वि.सागर कुलकर्णी 11-4, 11-8, 6-11, 11-3;
रजत कदम[5] वि.वि.शंतनू जोशी 11-9, 6-11, 8-11, 11-5, 11-6;
श्रेयश भोसले वि.वि.वेदांग जोशी 8-11, 11-7, 11-6, 11-7;
वैभव दहिभाते[3]वि.वि.पवन कदम 09-11, 11-7, 11-8, 11-8;
उपेंद्र मुळ्ये वि.वि.सुदीप अभ्यंकर 11-4, 11-9, 11-5;
सुयोग पाटील वि.वि.अमोल चाफेकर 11-3, 11-1, 11-7;
प्रौढ गट: दुसरी फेरी: 40 वर्षावरील गट:
उदय गडीकर वि.वि.रमेश शिरोलीकर 11-7, 7-11, 14-12, 11-9;
गुरु नादगौडा वि.वि.पराग पसरणीकर 11-7, 12-14, 11-9, 14-16, 12-10;
नचिकेत देशपांडे वि.वि.रवी कुलकर्णी 11-5, 7-11, 9-11, 11-8, 11-6;
राहुल देसाई वि.वि. जयंत कोकणे 11-6, 11-6, 11-7;
रॉनी तोडीवाला वि.वि.रवी कुलकर्णी 11-5, 11-6, 11-6;
तनय शिंदे वि.वि.संजय भट 11-3, 11-9, 11-8;
संतोष वक्राडकर[2] वि.वि.समीर भाले 11-4, 11-00, 11-6;
दिपेश अभ्यंकर[3] वि.वि.अनिल निंबाळकर 11-4, 11-4, 11-7;
अमित ढेकणे वि.वि.मनोज फडके 08-11, 12-10, 11-7, 11-9.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘एशिया क्रिकेटचे माहेरघर, शारजाह क्रिकेट स्टेडियम’, टीम इंंडियाशी आहे खास कनेक्शन
विराट-धोनी नाही, तर ‘या’ दोघांमुळे चहल आज भारताचा नंबर १ स्पिनर, स्वतःच दिले स्पष्टीकरण
पाकिस्तानी कर्णधाराचा आणखी एक विक्रम! नेदरलँडविरुद्ध एकेरी खिंड लढवत रचला इतिहास